akash naik rangoli Dainik Gomantak
गोवा

Akash Naik Rangoli : शिक्षकाने विद्यार्थ्यांसोबत साकारला भव्य 3-डी ॲनाकोंडा; गोमंतकीय आकाशची कलाकृती

आकाश नाईकच्या रांगोळी अतिशय प्रभावी असतात

गोमन्तक डिजिटल टीम

Akash Naik Rangoli : आकाश नाईक या रांगोळी कलाकाराच्या हातामधली जादू, कला प्रांतात अधिक गांभीर्याने घ्यायची गरज आहे. 3-डी इफेक्ट निर्माण करणाऱ्या त्याच्या रांगोळी अतिशय प्रभावी असतात.

रांगोळी ही अल्पकालीक कला असल्याने, या कलेकडे थोडेसे दुय्यम नजरेनेच पाहिले जाते पण आकाशने आजवर आपल्या रांगोळी कौशल्याचा जो प्रत्यय दर्शकांना दिला आहे तो नक्कीच दखल घेण्यासारखा आहे.

सावर्डे येथील श्री शारदा इंग्लिश हायस्कूलमध्ये आकाश चित्रकला शिक्षक आहेत. शालेय उपक्रमाचा भाग म्हणून, काल त्याने आपल्या काही विद्यार्थ्यांबरोबर मिळून त्रिमिती सदृश्य भास निर्माण करणारी ही ॲनाकोंडाची भव्य रांगोळी, सुमारे चार तासांच्या कालावधीत साकारली.

साधारण 25 X 20 फूट आकाराची ही रांगोळी आहे. रांगोळी समोर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या उंचीची तुलन करता या रांगोळीच्या आकाराची कल्पना येते. विद्यार्थ्यांसमवेत रांगोळी कलाकार आकाश नाईक देखील उभे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: देशी-विदेशी पर्यटकांनी किनारे फुलले! बेकायदा पार्ट्यांची धूम, ‘सायलंट झोन’मध्येही गोंगाट; नियमांना हरताळ

Arambol: 'जमीन रूपांतरास आपला पूर्ण विरोध'! आमदार आरोलकरांचे प्रतिपादन; हरमलवासीयांसोबत राहणार असल्याचा केला दावा

Rope Skipping Championship: राष्ट्रीय रोप स्किपिंगमध्ये गोव्याची उल्लेखनीय कामगिरी! पटकावली 24 पदके

Goa Fire News: चोर्ला घाटात पहाटेच्या सुमारास भीषण आग, बोलेरो टेम्पो जळून खाक; 5 लाखांचे नुकसान

स्वतंत्र गोव्याचे स्वप्न साकार करण्यासाठी ज्यांनी आपले तारुण्य, कुटुंब, प्रसंगी प्राणही अर्पण केले त्यांचे स्मरण होणे आवश्‍यक..

SCROLL FOR NEXT