Viraj Phadke
Viraj PhadkeDainik Gomantak

Mapusa Municipality: म्हापसा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी विराज फडके बिनविरोध

विरोधी गटातील नगरसेवक आनंद भाईडकर यांनी अर्ज घेतला मागे
Published on

Mapusa Municipality: म्हापसा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी विराज फडके याची निवड झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दोन अर्ज दाखल झाले होते. मात्र, विरोधी गटातील नगरसेवक आनंद भाईडकर यांनी अर्ज मागे घेतल्याने विराज याची बिनविरोध निवड झाली.

Viraj Phadke
Rishi Sunak Wife In Goa: घाबरू नका... UK पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नीची गोव्यात जेट स्की राईड

म्‍हापसा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदासाठी सत्ताधारी व विरोधी गटात ररस्सीखेच पाहायला मिळली होती. सत्ताधारी गटाकडून नगरसेवक विराज फडके तर विरोधी गटाकडून नगरसेवक आनंद भाईडकर हे रिंगणात होते. त्यामुळे बाजी कोण मारणार, याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती. या उपनगराध्यक्षपदाच्या शर्यतीत विराज फडके यांनी बाजी मारली.

यापूर्वी म्हापसा नगराध्यक्षपदासाठी 31 जानेवारीला निवडणूक पार पडली होती. त्यावेळी नगराध्यक्ष म्हणून प्रिया मिशाळ यांची बिनविरोध निवड झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com