increase in number of sportspersons Dainik Gomantak
गोवा

National Sports Championship :गोव्याचे सुमारे हजारभर खेळाडू 37 व्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी

त्यामुळे राज्यातील क्रीडापटूंची संख्या हजारभर होण्याचे संकेत आहेत, साहजिकच पदकांची संख्याही वाढू शकते.

गोमन्तक डिजिटल टीम

37th National Sports Championship : पणजी, यजमान या नात्याने ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याला बहुतांश खेळांत सहभागी होण्याची मुभा आहे. काही नवोदित खेळांचा अपवाद वगळता ३६ खेळांत राज्यातील क्रीडापटूंचा सहभाग निश्चित आहे.

त्यामुळे राज्यातील क्रीडापटूंची संख्या हजारभर होण्याचे संकेत आहेत, साहजिकच पदकांची संख्याही वाढू शकते.

‘‘बाकी राज्ये त्यांच्या राष्ट्रीय पातळीवरील कामगिरीनुसार गोव्यातील स्पर्धेसाठी पात्र ठरलेले आहेत. याउलट यजमान या नात्याने प्रत्येक खेळात भाग घेणे गोव्याला शक्य होईल. आतापर्यंत ३६ खेळांतील सहभाग पक्का आहे.

इतर नव्या खेळातही गोव्याने सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे राज्यातील सहभागी क्रीडापटूंची संख्या निश्चितच हजारभर होईल.

काही खेळांबाबत समस्या आहेत, त्यामुळे येत्या एक-दोन दिवसांत निश्चित आकडा स्पष्ट होईल,’’ असे गोवा ऑलिंपिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील ४३ खेळांत मिळून दहा हजाराहून जास्त क्रीडापटू सहभागी होणार असून स्पर्धेच्या इतिहासातील ही संख्या विक्रमी ठरली आहे.

बॅडमिंटन संघ जाहीर

पुरुष ः अयान शेख, राहुल देसवाल, करण धावसकर, निशांत शेणई, तेजन फळारी, अर्जुन फळारी, सनी सावंत, फ्रेडेरिक फर्नांडिस, अनुरेश हरी, एम. रेहान, प्रशिक्षक ः नवनीत नास्नोडकर, व्यवस्थापक ः प्रवीण शेणॉय.

महिला ः अंजना कुमारी, लिडिया बार्रेटो, यास्मिन सय्यद, प्रांजल चिमुलकर, अनुरा प्रभुदेसाई, रिया मुखर्जी, साक्षी कुरभेळगी, अनघा करंदीकर, अनानिका सिंग, अनीस काओस्वार, प्रशिक्षक ः उत्सव मिश्रा, व्यवस्थापक ः संध्या मेलाशीमी.

अनुरा, अंजना, प्रांजलला पुन्हा पदकाची संधी

गोव्याने २०१५ साली केरळमध्ये झालेल्या ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिला बॅडमिंटनमध्ये सांघिक ब्राँझपदक जिंकले होते. त्या संघातील अनुरा प्रभुदेसाई, प्रांजल चिमुलकर, अंजना कुमारी यावेळच्या स्पर्धेतही गोव्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

त्यामुळे त्यांना आणखी एका पदकाची संधी असेल. अखिल भारतीय पातळीवरील रेल्वे बॅडमिंटन स्पर्धेत खेळताना अनुरा हिची दुहेरीतील नियमित साथीदार रिया मुखर्जी गोव्यातर्फे खेळणार असल्यामुळे महिला दुहेरीत चांगली कामगिरी अपेक्षित आहे.

अनुरा-रिया जोडीने राष्ट्रीय पातळीवर पदके जिंकलेली आहेत. गुरुवारपासून (ता. १९) बॅडमिंटनमधील सामने ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये खेळले जातील.

गतवर्षी गोव्याचे ८१ क्रीडापटू : गतवर्षी गुजरातमध्ये झालेल्या ३६व्या क्रीडा स्पर्धेत गोव्याच्या ८१ क्रीडापटूंनी भाग घेतला होता व पाच ब्राँझपदके मिळाली होती. गुजरातमधील स्पर्धेत गोव्याचा १३ खेळांत सहभाग होता.

मल्लखांब, फुटबॉल (महिला), कबड्डी, सायकलिंग, ज्युदो, वुशू, बॉक्सिंग, ट्रायथलॉन, ॲथलेटिक्स, बीच व्हॉलिबॉल, बॅडमिंटन, जिम्नॅस्टिक्स, जलतरण या क्रीडा प्रकारात गोव्याने भाग घेतला होता. त्यापैकी जिम्नॅस्टिक, जलतरण, बीच व्हॉलिबॉल, मल्लखांब, बॉक्सिंग या खेळात गोव्याला प्रत्येकी एक ब्राँझपदक मिळाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DYSP यांच्या कार्यालयाजवळ 'ती' विकायची नारळपाणी, बँकेच्या मॅनेजरला हनीट्रॅपमध्ये अडकवलं; पण, ब्लॅकमेल करुन 10 लाख उकळण्याचा डाव फसला

Viral Post: 'तुम हारने लायक ही हो...' आफ्रिकेविरूध्द टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, दिग्गज खेळाडूची पोस्ट व्हायरल

'IFFI 2025' मध्ये गोव्यातील 2 चित्रपटांना संधी! मिरामार, वागातोर किनाऱ्यांसह मडगावच्या रविंद्र भवनात 'Open-air Screening' ची मेजवानी

Goa Police: 5000 पेक्षा अधिक कॉल, 581 तक्रारींवर तत्काळ कार्यवाही; सायबर गुन्ह्यांना 100% प्रतिसाद देणारं 'गोवा पोलीस' दल देशात अव्वल

आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचा डंका! वास्कोच्या मेघनाथने दुबईत जिंकली 2 रौप्य पदके; मेन्स फिटनेस स्पर्धेत वाढवला देशाचा मान

SCROLL FOR NEXT