37th National Games Goa: 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आणखी तीन खेळांवर टांगती तलवार आहे. व्हॉलिबॉलनंतर आता हॅण्डबॉल, तायक्वांदो, स्क्वे मार्शल आर्ट या खेळांचा समावेश धोक्यात आहे. योग्य तोडगा निघाला नाही, तर हे खेळसुद्धा वगळण्याची शक्यता आहे.
इंडियन ऑलिंपिक संघटनेने (आयओए) व्हॉलिबॉलसाठी नियुक्त केलेल्या अस्थायी समितीद्वारे महासंघाची निवडणूक घेण्यात आलेली नाही. त्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेसाठी मानांकनानुसार पुरुष व महिला हॅण्डबॉल संघ, तसेच बीच व्हॉलिबॉल संघ निवडणे शक्य नसल्याचे अस्थायी समितीने स्पष्ट केले आहे. बीच व्हॉलिबॉलसाठी क्रीडामंत्री गावडे प्रयत्नशील आहेत.
आसामला पहिल्या सुवर्णपदकाचा मान
आसामच्या महिला बॅडमिंटन संघाने 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक जिंकण्याचा मान मिळविला. सांघिक गटातील अंतिम लढतीत त्यांनी महाराष्ट्राला ३-० फरकाने हरवून विजेतेपद पटकावले. महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
आयओए अध्यक्ष, केंद्रीय क्रीडामंत्री, केंद्रीय क्रीडा सचिव यांना मी पत्र लिहिले असून व्हॉलिबॉल खेळ सहभागी होण्यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडे जबाबदारी देण्याची मागणी केली आहे. माझ्याकडे सध्या केवळ हाच पर्याय आहे. मी खूप प्रयत्न करत असून अजून सकारात्मक काही घडलेले नाही. बीच व्हॉलिबॉल घेण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. मात्र, निर्णय त्यांना घ्यायचा आहे. - गोविंद गावडे, क्रीडामंत्री.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.