Goa Vaccination Dainik Gomantak
गोवा

Goa: कोविड प्रतिबंधक लसीसाठी 36.60 कोटी खर्च

राज्यातील (Goa) कोरोना नियंत्रणात यावा यासाठी आत्तापर्यंत 36.60 कोटी रुपयाचे लसीचे डोस गोव्याला देण्यात आले.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील कोरोना नियंत्रणात यावा यासाठी आत्तापर्यंत 36.60 कोटी रुपयाचे लसीचे डोस गोव्याला देण्यात आले. गोव्यातील लसीकरणासाठी केंद्र सरकारने गोव्याला 34 कोटी 45 लाख 38 हजार रुपये किमतीचे 11 लाख 48 हजार 460 कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस पुरवले आहे. मात्र लसीकरण चालू असताना केंद्राकडून वेळेवर डोस उपलब्ध न झाल्याने गोवा सरकारने 2 कोटी 15 लाख 38 हजार 200 रुपयांची लस खरेदी केली. प्रति 300 रु. किमतीचे 71 हजार 764 लसीचे डोस सरकारला खरेदी करावे लागले.

लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने आत्तापर्यंत गोव्याला मोठ्या प्रमाणात ‘कोविशिल्ड’ प्रतिबंधक लसीचे डोस मोफत दिले. या प्रत्येक डोसची किंमत 300 रुपये आहे.

केंद्राकडून सुरवातीपासून गोव्याला जेवढी गरज लागते तेवढे डोस उपलब्ध केले गेले. मध्यंतरी सर्वच राज्याची मागणी वाढल्यानंतर इतर राज्यासह गोव्यातही लसीचा तुटवडा जाणवू लागला होता. लसीच्या तुटवड्यामुळे इतर राज्यांनी लसीकरण थांबवले होते, मात्र गोवा सरकारने ते न थांबवता दोन टप्प्यांत 71,794 लसीचे डोस खरेदी केले. केंद्राने आत्तापर्यंत 11,48, 460 लसीचे डोस गोव्याला प्रदान केले आहेत. सध्या राज्याकडे 2,13,430 लसीचे डोस उपलब्ध आहेत, अशी माहिती डॉ. बोरकर यांनी दिली.

बुधवारी तीन बळी

राज्यात आज 5,052 कोविड तपासणीसाटी चाचण्या घेण्यात आल्या. तपासणी अहवालानुसार 192 नवे कोरोनाबाधित सापडले तर १९६ कोरोनाबाधित बरे झाले. आज दिवसभरात 3 कोरोनाबाधितांचे निधन झाल्यामुळे राज्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 3082 झाली आहे. तर राज्यात आज सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1950 आहे. आज राज्यात 15,411 इतके लसीकरण झाले. ज्यात 9,755 जणांनी पहिला डोस तर 5,022 जणांनी दुसरा डोस घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT