Fraud Case Dainik Gomantak
गोवा

Parcem Panchayat : पार्से पंचायतीत 35 लाखांचा घोळ; ‘दक्षता’कडे तक्रार

घोटाळा नसल्याचा माजी सरपंचांचा दावा

दैनिक गोमन्तक

पार्से पंचायतीमध्ये मावळत्या पंचायत मंडळाकडून एकूण 35 लाखांचा घोळ झाल्याची तक्रार पार्से ग्रामस्थांनी दक्षता खात्याकडे 30 मे रोजी तक्रार नोंदवलेली आहे. दरम्यान, आम्ही कसलाही घोटाळा केलेला नाही, असा दावा माजी सरपंच प्रगती सोपटे यांनी केला.

14व्या वित्त आयोगांतर्गत पंचायतीकडे काही निधी होता. तो कसा वापरावा यासाठी पंचायत मंडळाची बैठक झाली, आणि त्यानुसार ठरावाद्वारे सर्वानुमते निर्णय घेतला होता. त्यानुसार कोणते सामान खरेदी करावे, याची संमती घेतली होती. त्याला अधिकाऱ्यांनीही मंजुरी दिली होती,असे माजी सरपंच प्रगती सोपटे यांनी सांगितले.

पार्से पंचायतीने कुणाचीही संमती न घेता काही प्रमाणात सामान खरेदी केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. याविषयी नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत याविषयी ठराव मंजूर करून या प्रकरणाची दक्षता खात्याकडून चौकशी करावी, अशी मागणी केली. त्यानुसार विद्यमान पंचायत मंडळाने ग्रामस्थांच्या वतीने दक्षता विभागाकडे चौकशीची मागणी केली आहे.

3.5 लाखांची खुर्ची खरेदी; पंचायतीत एकही नाही !

पार्सेच्या माजी पंचायत मंडळाने फोकस आणि वायर,असे वीज सामान सावंतवाडी येथून 15 लाख खर्चून आणल्याचे दाखवले. 14 लाखाचे कचरा विल्हेवाट सामान आणल्याची बिले सादर केली, आणि केवळ पंचवीस टक्के ग्रामस्थांना ती वितरित केली असतील.

शिवाय 3.5 लाखांच्या खुर्च्या खरेदी केल्याचे बिल आहे. परंतु पंचायतीकडे एकही खुर्ची नाही, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. काही ग्रामस्थांनी ‘आरटीआय’ अंतर्गत माहिती मिळवल्यानंतर हे प्रकरण उघड झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लिव्ह-इन, लग्न अन् मग मृत्यूचा थरार! नवऱ्यानं घेतला गळफास, बायकोनं 17व्या मजल्यावरुन मारली उडी; बंगळुरुतील धक्कादायक घटना

IPL 2026: आयपीएल ब्रेकिंग! मुंबई-कोलकाता सामना संपताच मूत्यू; मुंबईतील हॅाटेलमध्ये सापडला मृतदेह

Guru Gochar 2026: नशिबाचा मास्टरस्ट्रोक! 'या' 5 राशींसाठी एप्रिल महिना ठरणार 'टर्निंग पॉईंट'; धन वर्षावासह करिअरमध्ये प्रगतीची संधी

Dailyhunt आणि Josh च्या प्रगतीला नवा वेग! पी. आर. रमेश आता सांभाळणार VerSe Innovation च्या ऑडिट कमिटीची धुरा

US Iran War: 21 युद्धनौका, 3500 कमांडो, 50000 सैनिक… तरीही ट्रम्प इराणचे 440 किलो युरेनियम जप्त करु शकणार नाहीत, कारण काय?

SCROLL FOR NEXT