Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: गोव्यात सुविधांसाठी 33 हजार कोटी खर्च! मुख्यमंत्र्यांनी सांगितले डबल इंजिनचे महत्व; पर्यटक वाढल्याचा दावा

Goa infrastructure development: जीसीसीआय ११७ व्या बैठकीत मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी वाहतूकमंत्री गुदिन्हो, नूतन अध्यक्ष प्रतिमा धोंड, माजी अध्यक्ष श्रीनिवास धेंपे उपस्थित होते.

Sameer Panditrao

पणजी: राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मागील दहा वर्षांत राज्य सरकारने ३३ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. विमानतळ ते पोर्ट आणि पोर्ट रेल्वे आणि रेल्वे ते राष्ट्रीय महामार्ग असे दळणवळणाचे जाळे डबल इंजिन सरकारमुळेच तयार झाल्याचे मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजच्या (जीसीसीआय) ११७ व्या बैठकीत मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, नूतन अध्यक्ष प्रतिमा धोंड, माजी अध्यक्ष श्रीनिवास धेंपे उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत यांनी प्रतिमा धोंड यांची नियुक्ती केल्याबद्दल जीसीसीआयचे कौतुक केले. यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि सरकारकडून त्यांना पूर्ण पाठिंबा मिळेल, असे आश्वासन दिले. विकसित भारत २०४७ संकल्पना असली तरी आपण त्यापुढील दहा वर्षांचा विचार का करू नये. डिजिटायलेझेशन सस्टेनेबल डेव्हल्पमेंटवर सरकारने भर दिला आहे.

खासगी क्षेत्राला विकासात सहभागी करून घेण्याचे धोरणही राबविल जात आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे २० सेवा दिल्या गेल्या आहेत, त्याचे उद्योजकांनी स्वागत करायला हवे. गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या ज्या किचकट बाबी आहेत, त्या कमी करण्यात आल्या आहेत. महिलांचा स्टार्टअपमध्ये ५० टक्के वाटा आहे, ही बाब भूषणावह आहे. स्टार्टअपसाठी सुमारे चार कोटी रुपयांचे अनुदान स्टार्टअप पॉलिसीसाठी वाटप करण्यात आले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

स्वयंपूर्ण गोवा निर्माण करण्यासाठी अंत्योदय घटकापर्यंत काम करीत आहोत. त्यासाठी गोव्यात होत असलेल्या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

‘पर्यटक घटले नाही, वाढले’

लखपती दिदी योजनेसाठीही गोव्यात महिलांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. गोवा औद्योगिक विकास महामंडळाने आपल्या औद्योगिक क्षेत्रात महिलांसाठी खास भूखंड ठेवले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. पर्यटन क्षेत्राविषयी ते म्हणाले, पर्यटक घटल्याची ओरड होत आहे, परंतु आपण अधिकृत आकडेवारीनुसार सांगत आहोत की, २२ टक्के देशी आणि ३ टक्के परदेशी पर्यटकांची वाढ झाली आहे. याशिवाय पर्यटनाशी निगडीत आध्यात्मिक पर्यटन आणि होम स्टे धोरण सरकारने जाहीर केले. तसेच सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांचा शवप्रदर्शन सोहळा यशस्वीरित्या करून दाखविल्याचे लोक सांगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT