गोवा

Fire In Goa: आगोंद-केरी येथील पॉलिहाऊसला आग लागून 33 लाखांचे नुकसान

एक तास परिश्रम करून अग्निशमन दलाच्या जवानांना पॉलिहाऊस वाचविण्यात यश मिळविले.

गोमन्तक डिजिटल टीम

आगोंद-केरी येथील 4 हजार चौ.मीटर क्षेत्रात फैलावलेल्या शामराव नाईक गावकर यांच्या ऑर्किड बागायतीच्या पॉलिहाऊसला शनिवार, 11 रोजी सायंकाळी 7.30 वा.च्या दरम्यान आग लागून बेचिराख झाल्यामुळे प्रचंड नुकसान झाले.

एक तास परिश्रम करून काणकोण अग्निशमन दलाच्या जवानांनी 250 चौ.मीटर क्षेत्रात असलेले पॉलिहाऊस वाचविण्यात यश मिळविले. या आग दुर्घटनेत पॉलिहाऊसचे मालक शामराव देसाई यांना 33 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पॉलिहाऊसला लागूनच असलेल्या माळरानाला लागलेल्या आगीने हळू-हळू सुके गवत व नंतर पॉलिहाऊसवरील प्लास्टिकने पेट घेतल्यावर तेथील जलवाहिनी, पंप, ऑर्किडची रोपटी सर्व काही भस्मसात झाली, असे शामराव नाईक गावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Goa visit: अमित शहा 6 सप्‍टेंबरला ठरविणार रणनीती; गोवा दौऱ्यामध्ये मंत्री, आमदारांसह गाभा समितीचीही घेणार बैठक

Horoscope: महादेवाच्या कृपेने दूर होणार संकटं! सोमवारपासून 'या' राशींना प्रत्येक क्षेत्रात यशाची शक्यता, रखडलेली कामं वेगाने पूर्ण होणार

Hampi History: हत्तींसाठी राजेशाही तबेले, घोड्यांसाठी हौद अन् भूमिगत कालवे; विजयनगरच्या वैभवाची अद्भुत कहाणी

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

SCROLL FOR NEXT