Sunburn Festival google image
गोवा

Sunburn Festival: हणजूण कोमुनिदाद झाली मालामाल

Sunburn Festival: ‘सनबर्न’ आयोजकांकडून 3.28 कोटी रुपये प्रशासकाकडे जमा

दैनिक गोमन्तक

Sunburn Festival: हणजूण कोमुनिदादच्या मालमत्तेवर गेल्या अनेक वर्षांपासून सनबर्न ईडीएम महोत्सव होऊनही त्यांच्या तिजोरीत काहीच शुल्क जमा होत नव्हते. हणजूण कोमुनिदादकडून ना हरकत दाखला (एनओसी) न घेताच महोत्सव सुरू केल्याने उच्च न्यायालयात याचिका सादर झाली होती.

ही याचिका शुक्रवारी न्यायालयासमोर सुनावणीस येण्यापूर्वीच सनबर्न आयोजक स्पेसबाऊंड वेबलॅब प्रा.लि. कंपनीने विविध शुल्क मिळून सुमारे 3.28 कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट जमा केल्याने उच्च न्यायालयाने प्राथमिक सुनावणीनंतर याचिका निकालात काढली. या एकूण प्रकरणात हणजूण कोमुनिदाद मात्र मालामाल झाली आहे.

सनबर्न आयोजकांनी शुक्रवारी जमा केलेल्या ३.२८ कोटी रकमेपैकी २,४३,१४,६०७ रुपये हणजूण कोमुनिदादला व्यावसायिक शुल्क, ४८,६२,९२१ रुपये उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासकाकडे देरम (शुल्क), २४,३१,४६० रुपये नागरी प्रशासक संचालक (जिल्हाधिकारी) तर १२,१५,७३२ रुपये सुरक्षा ठेव याचा समावेश आहे.

हणजूण कोमुनिदादची सर्वोच्च न्यायालयात भाडेपट्टीवर मामलत्ता देण्याच्या शुल्क आकारणीसंदर्भातची याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे कोमुनिदादची २.४३ कोटींची रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेत जमा होईल व उर्वरित अधिकारिणींची रक्कम त्यांना दिली जाईल, अशी माहिती ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी न्यायालयाला दिली, ती मान्य करण्यात आली.

हणजूण कोमुनिदादच्या लाखो चौ.मी. जमिनीचा वापर सनबर्न ईडीएम महोत्सव आयोजकांकडून होत असल्याने त्याच्यापोटी शुल्क देण्याचा निर्णय कोमुनिदाद गावकारांनी घेतला होता. १५ टक्के आगाऊ रक्कम न भरल्यास ना हरकत दाखला न देण्याचा निर्णय घेतला होता. कोमुनिदादीचा परवाना न घेता सनबर्न सुरू झाल्याने तातडीने कालच रॉयसल डिसोझा यांनी याचिका दाखल केली होती.

आयोजकांनी भाडेपट्टी न भरल्याने कोमुनिदादच्या जमिनीवर आयोजित केलेला सनबर्न ईडीएम महोत्सव हटवण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकादाराने केली होती. सनबर्न आयोजकांनी ईडीएम महोत्सवासाठी लागणाऱ्या विविध परवान्यांसाठी फेब्रुवारी 2023 मध्ये अर्ज केला होता. गेल्या १० डिसेंबरला तात्पुरता परवाना त्यांना देण्यात आला होता. हणजूण कोमुनिदादने भाड्याची रक्कम कळवल्यानंतर इतर शुल्कांसह आयोजकांनी उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासकांच्या नावे एकूण ३.२८ कोटींचे तीन वेगवेगळे धनादेश जमा केले. मात्र, हणजूण कोमुनिदादने धनादेश नको तर डिमांड ड्राफ्ट द्या, अशी विनंती केली होती.

दरम्यान, सनबर्न ईडीएमसाठी वापरण्यात येणाऱ्या वागातोर येथील जमिनीच्या भाडेपट्टीसंदर्भात किंमत ठरवण्यासाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पेसबाऊंड वेबलॅब प्रा.लि. कंपनीला मागील वर्षाची थकबाकी देण्याचे निर्देश दिले होते तसेच यावर्षीसाठीच्या परवान्यासाठी १५ टक्के रक्कम सुरक्षा ठेव म्हणून जमा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आयोजकांनी मागील संपूर्ण थकबाकी जमा केली होती. मात्र, यावर्षीच्या भाडेपट्टीची रक्कम जमा केली नव्हती.

अशाप्रकारे आहे रक्कम...

आयोजकांनी एकूण जमा केलेली रक्कम - ३,२८,२४,७२० रु.

हणजूण कोमुनिदादला मिळणारी रक्कम - २,४३,०१,६०७ रु.

नागरी प्रशासनाला (जिल्हाधिकारी) मिळालेली रक्कम - २४,३१,४६० रु.

कोमुनिदाद प्रशासनाला मिळालेली रक्कम - ४८,६२,९२१ रु.

१५ टक्के सुरक्षा ठेव रक्कम - १२,१५,७३२ रु.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

SCROLL FOR NEXT