Goa Sunburn Festival: ‘सनबर्न’मध्ये 82 लाखांच्या पासची चोरी; पाच अटकेत

Goa Sunburn Festival: 60 लाखांचे पास जप्त; 13 मोबाईल हरवले
Goa Sunburn Festival
Goa Sunburn FestivalDainik Gomantak

Goa Sunburn Festival: वागातोर येथे सुरू असलेल्या सनबर्न ईडीएम महोत्सवात सुमारे 82.50 लाखांच्या 600 तिकिटांच्या (पासेस) चोरीप्रकरणी हणजूण पोलिसांनी तिकीट विक्रीची जबाबदारी सोपवलेल्या कंपनीच्या पाच कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे 60 लाखांची तिकिटे जप्त केली आहेत.

Goa Sunburn Festival
CM Pramod Sawant: नेहरूंविषयक मुख्यमंत्र्यांचे विधान वादाच्या भोवऱ्यात

संशयितांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिल्याची माहिती म्हापशाचे पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी दिली.

सनबर्न ईडीएम महोत्सव प्रवेशासाठीची सुमारे 600 पासेस गायब झाल्याची तक्रार सनबर्नचे सहसंयोजक अरविंद कुमार यांनी हणजूण पोलिस स्थानकात गुरुवारी रात्री दाखल केली. त्यांनी शिवम च्यारी, महेश गावस, मंजित गावस, यासीन मुल्ला आणि सिद्धगौडा हंचीनल यांच्यावर संशय व्यक्त केला होता.

त्यानुसार पोलिसांनी या पाचही जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी तिकिटे चोरल्याचे उघड झाले. त्यांनी चोरलेल्या तिकिटांपैकी 22.50 लाखांची तिकिटे ऑनलाईन पेमेंट तसेच रोख रक्कम घेऊन विकली आहेत. ‘सनबर्न’च्या पहिल्याच दिवशी महोत्सवस्थळी आणि परिसरात गुरुवारी 14 मोबाईल फोन हरवल्याच्या तक्रारी नोंद केल्या आहेत.

कमी किमतीत विकत होते पास

म्हापसा : सनबर्न आयोजकांनी तिकीट विक्रीची जबाबदारी एका खासगी कंपनीवर सोपवली होती. त्यानुसार या कंपनीचे सुमारे १६० कर्मचारी महोत्सवस्थळी तिकीट विक्री करत होते. यातील अटक केलेल्या पाचही संशयितांनी व्हीआयपी पास चोरले होते आणि ते परस्पर कमी किमतीत महोत्सवस्थळी संगीतप्रेमींना विकत असल्याचे आढळले.

‘त्या’ दोघी मद्यधुंद

म्हापसा : सनबर्न महोत्सवस्थळी गुरुवारी रात्री उशिरा मद्यधुंद स्थितीत असलेल्या दोन पर्यटक महिलांना रुग्णवाहिकेतून नेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली. परंतु या महिलांना लगेच इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला. या महिलांनी अतिमद्यपान केल्याने त्यांना व्यवस्थित उभे राहता येत नव्हते. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. याप्रकरणी हणजूण पोलिसांत तक्रार नोंदवलेली नाही, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com