Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: थिवीतील 'त्या' महिलेचा खूनच; आरोपी गजाआड

धानवा परिसरातील विहिरीत आढळला होता मृतदेह

दैनिक गोमन्तक

थिवी येथील धानवा परिसरात विहिरीत एका महिलेचा मृतदेह आढळला होता. ही घटना तीन दिवसांपूर्वी (4 नोव्हेंबर ) घडली होती. पोलिसांना या मृतदेहाची ओळख पटवण्यात यश आले असून तो मृतदेह कर्नाटक येथील महिलेचा असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हत्या करणारा देखील कर्नाटक येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

(30 year old female body has been found with stone tied around her waist inside a well at Thivim Dhanva )

मिळालेल्या माहितीनुसार 4 नोव्हेंबर रोजी थिवी येथील धानवा परिसरात एका विहिरीत सडलेल्या अवस्थेत यल्लमा बेकिनाल या महिलेचा मृतदेह आढळला होता. या महिलेच्या मृतदेहाला दगड बांधलेला असल्याचे आढळले असल्याने पोलिसांनी ही हत्या असावी असा संशय व्यक्त केला होता. तो आता खरा ठरला आहे. त्यामूळे धानवा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मृत यल्लमा बेकिनाल ह्या मुळच्या कर्नाटकातील विजापूर येथील आहेत. पोलिसांनी तपासाचा वेग वाढवत गुन्हेगाराला ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेला गुन्हेगार हावेरी, कर्नाटक येथील असल्याचे तपासात उघड झाले आहे.

पती विजापूरला गेल्यानंतर झाला घात

आरोपीचे नाव मंजू हनुमंतप्पा नजंत्री (Manju Nhajantri ) वय 39 वर्षे असे असल्याचे समोर आले आहे. आरोपीची चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली आहे. मृत महिला आणि तिच्या पतीमध्ये शाब्दिक वाद झाला होता. त्यामूळे तीचा पती मूळ गावी विजापूरला निघून गेल्यानंतर हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: 'दाबोळी' विमानतळाची उंच भरारी! पटकावला द्वितीय क्रमांक; जागतिक क्रमवारीत मिळवले मानाचे स्थान

IFL 2026: 'धेंपो क्लब' सलग 2 पराभवांनंतर नामुष्की टाळणार? नामधारी एफसीविरुद्ध घरच्या मैदानावर फातोर्डा येथे रंगणार सामना

Lairai Jatra: लईराई जत्रोत्सवात भाविकांच्या सुरक्षेसाठी ‘ॲक्शन प्लॅन’! देवस्थान समिती बरखास्तीवर सरकारचे आश्वासन

Karapur: 'आमची शेता आमका जाय'! मेगा प्रकल्प विरोधात कारापूरवासीय आक्रमक; मामलेदार कार्यालयावर धडक मोर्चा

Goa Politics: खरी कुजबुज; ...लाखोंचा चुराडा

SCROLL FOR NEXT