Goa Mega Job Fair: गोवा सरकारने मेगा जॉब फेअरबाबत घेतला मोठा निर्णय

तीनशेहून अधिक कंपन्या होणार सहभागी
Goa Job Fair
Goa Job FairDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा सरकारने येत्या 08 नोव्हेंबरला मेगा जॉब फेअर (Goa Mega Job Fair) आयोजित करण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे. सकाराने राज्यातील युवकांसाठी हा मेळावा एक दिवसाऐवजी दोन दिवस घेण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार हा मेळावा 8 आणि 9 नोव्हेंबर या दिवशी पार पडणार आहे.

(Goa Government has announced the Goa Mega Job Fair will be organized on November 8 and 9)

Goa Job Fair
Tulsi Vivah 2022: राजधानी पणजीसह राज्यभरात तुळशी विवाह उत्साहात

उमेदवारांना या जॉब फेअरमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. याला राज्यातील युवकांनी दिलेल्या तुफान प्रतिसादामुळे हा निर्णय बदण्यात आला असल्याचं गोवा सरकारने म्हटले आहे. या जॉब फेअरमधून गोव्यातील तरूण-तरूणींना विविध क्षेत्रात कामाची संधी उपलब्ध होणार आहे.

या जॉब फेअरमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तीनशेहून अधिक कंपन्या सहभागी होणार आहेत. गोमंतकीय युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

Goa Job Fair
Fraud News: सुएलांकडून तक्रार मागे

जॉब फेअर मेळावा नेमका कोणत्या ठिकाणी ?

बेरोगार आणि रोजगार विभागामार्फत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी मैदान, तालेगाव येथे हा जॉब फेअर मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी हा उपक्रम महत्वाचा असून, अनेकांना त्यांचा फायदा होईल. या नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रात इच्छुक उमेदवारांना संधी मिळणार असल्याचं कामगार मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com