Porvorim Fatal Accident Dainik Gomantak
गोवा

Porvorim Fatal Accident: राज्याला अपघातांचे ग्रहण! पर्वरीत भरधाव कारने घेतला तिघांचा बळी; दोघांची प्रकृती गंभीर

पर्वरीतील डेल्फीनो सुपर मार्केटच्या मागे हा अपघात घडला.

Kavya Powar

Porvorim Fatal Accident: आठवड्याच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काल (शनिवार, 2 सप्टेंबर) पर्वरीमध्ये झालेल्या भीषण स्वयंअपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. म्हापसाच्या दिशेने जात असलेल्या भरधाव कारचा अपघात घडला आहे.

'त्या' भरधाव कारने घेतला तिघांचा बळी!

पर्वरीतील डेल्फीनो सुपर मार्केटच्या मागे हा अपघात घडला. म्हापसाच्या दिशेने जात असलेल्या टाटा नेएक्सोन EV या कारमधील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार एका झाडाला जाऊन आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात मृत पावलेले

  • ॲबिगेल डिसुझा (मेरशी, 21)

  • वालड्रोफ डिसुझा (हणजूण, 30)

  • शॉन फर्नांडिस (पर्रा, 27)

गंभीर जखमी

  • फिओना डिसुझा (25)

  • निनोश्का फर्नांडिस (हणजूण, 21)

दरम्यान, यामध्ये गाडीतील दोघेजण गंभीर जखमी असून त्यांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.

माहितीनुसार, गाडीतील सर्वजण हे एकमेकांचे चुलत भाऊ-बहिण असल्याचे सांगण्यात येत आहे. कार भरधाव वेगात होती, त्यामुळेच हा अपघात झाला. राज्यातील वाढलेले अपघात हे आता चिंतेचे कारण बनले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

'SIR'च्या मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; यतिश नाईक म्हणाले, 'हा तर संविधानिक संस्थांवर हल्ला’

SCROLL FOR NEXT