Goa Covid-19 update Dainik Gomantak
गोवा

Goa Covid-19: 29 कोरोनाबाधित व्हेन्टिलेटरवर

राज्यात (Goa) कोरोना नियंत्रणात येत असून गेल्या 14 दिवसात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही कमी झाली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा (Goa) वैद्यकीय महाविद्यालय (GMC) व सुपर स्पेशालिटी येथे मिळून 29 कोरोना (Covid-19) रुग्ण व्हेन्टिलेटरवर असल्याची माहिती गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली आहे. सुपर स्पेशालिटीमध्ये 25 कोरोना रुग्ण आयसीयुमध्ये असल्याची माहिती तेथील डॉक्टरानी दिली. (29 corona patients are on ventilators In Goa)

राज्यात कोरोना नियंत्रणात येत असून गेल्या 14 दिवसात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही कमी झाली आहे. नवे कोरोनाबाधितही कमी प्रमाणात सापडत आहेत. गेल्या 14 दिवसात 71 कोरोनाबाधितांचे निधन झाले आहे. मे महिन्याच्या 11 तारखेला एकाच दिवशी 75 कोरोनाबाधितांना मरण आले होते. ही संख्या राज्यात एका दिवसातील सर्वात जास्त बळींची होती. त्यानंतर ती कमी कमी होत गेली.

जुलै महिन्यात तो नियंत्रणात येत आहे. जुलैच्या गेल्या सहा दिवसात 25 कोरोनाबाधितांचे निधन झाले. तर 1134 नवे कोरोनाबाधित सापडले आणि 1426 कोरोनाबाधित बरे झाले असून गेल्या चोवीस तासात 4 जणांचा बळी गेला.

"कोरोनामुळे गंभीर स्थिती झालेल्या रुग्णांना व्हेन्टिलेटरवर ठेवले जाते. गोमेकॉमध्ये सध्या 11कोरोना रुग्ण व्हेन्टिलेटवर असून सुपर स्पेशालिटीमध्ये 18 कोरोना रुग्ण व्हेंटिलेटर आहेत, असे एकूण 29 कोरोना रुग्ण या दोन्ही ठिकाणी व्हेंन्टिलेटरवर आहेत."

- डॉ. शिवानंद बांदेकर, डीन, गोमेकॉ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: हडफडे दुर्घटनेतील आरोपी लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात! लवकरच भारतात आणण्याची शक्यता

Goa Nightclub Fire: क्लब मालकाकडून 25 लाख रुपयांचा हफ्ता पोहोचत होता, माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांचा आरोप

Omkar Elephant: ओंकार हत्तीची दोडामार्गात पुन्हा एन्ट्री; बागायतींचे मोठ्या प्रमाणात केलं नुकसान, कळपात परतण्याची शक्यता

ZP Election: डिचोलीत उमेदवारांचे भवितव्य महिला मतदारांच्या हातामध्‍ये! चारही मतदारसंघात 31 हजार 723 मतदार

Smriti Mandhana: 'जास्त प्रेम करणारे...', स्मृती मंधाना लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच बोलली Watch Video

SCROLL FOR NEXT