Goa: गोमंतकीयांसाठी 'सुवर्ण क्षण'!

गोवा (Goa) विधानसभेचे कामकाज 'पेपरमुक्त' करण्याचा निर्णय घेणारे आदरणीय राजेंद्र आर्लेकर हे देशातील पहिले सभापती होते.
Goa: Rajendra Vishwanath Arlekar
Goa: Rajendra Vishwanath ArlekarDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: गोवा विधानसभेचे कामकाज 'पेपरमुक्त' करण्याचा निर्णय घेणारे आदरणीय राजेंद्र आर्लेकर हे देशातील पहिले सभापती होते. गोवा विधानसभेचे सभापती म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी हा निर्णय घेवून विधानसभेच्या इतिहासात एक नवीन पायंडा घालून दिला. असे गौरवोद्गार डिचोलीचे आमदार तथा विद्यमान सभापती राजेश पाटणेकर यांनी काढले. आदरणीय आर्लेकर यांची घटनात्मक आणि सर्वोच्च अशा राज्यपालपदी नियुक्ती होणे, हा संपूर्ण गोव्याचा सन्मान आहे. असेही सभापती पाटणेकर यांनी म्हटले आहे. श्री. राजेंद्र आर्लेकर यांच्या रूपाने गोव्याला राज्यपालपदाचा मान मिळणे, हा गोमंतकीय राजकारणाच्या इतिहासातील सुवर्ण क्षण असल्याचे सभापती पाटणेकर यांनी म्हटले आहे. (Rajendra Arlekar was the first Speaker of the country to take a decision to make the Goa Legislative Assembly paperless)

माजी सभापती आणि माजी मंत्री आदरणीय राजेंद्र आर्लेकर यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर सभापती राजेश पाटणेकर यांनी दै. 'गोमन्तक' कडे आपले मनोगत मांडले. आदरणीय आर्लेकर हे मूळ डिचोली तालुक्यातील मये गावचे सुपूत्र. त्यामुळे डिचोलीतील एक नागरिक म्हणून आपल्यासह डिचोली तालुक्यातील जनतेसाठी अभिमानास्पद असा हा क्षण आहे. असेही पाटणेकर म्हणाले. आदरणीय आर्लेकर यांची राज्यपालपदी नियुक्ती हा योग्य निर्णय असल्याचेही पाटणेकर म्हणाले.

Goa: Rajendra Vishwanath Arlekar
Goa: भाजपचे संस्थापक डॉ. मुखर्जी यांना मये भाजपकडून आदरांजली

अभ्यासू व्यक्तिमत्व

राज्य विधानसभेच्या मागील कार्यकाळात श्री. आर्लेकरजी यांनी विधानसभेचे सभापती म्हणून जबाबदारी पार पडलेली आहे. ते सभापती असताना आपण विधानसभेत नव्हतो. मात्र श्री. आर्लेकरजी यांची काम करण्याची पद्धत आपण अनुभवलेली आहे. श्री. आर्लेकर हे हुशार तेवढेच स्वच्छ आणि मितभाषी स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत. एखाद्या विषयावर अभ्यास करून योग्य तो निर्णय घेण्याची त्यांच्यात क्षमता आहे.

Goa: Rajendra Vishwanath Arlekar
पाहा या 8 राज्यांचे 'हे' आहेत नवीन राज्यपाल...!

भाजपसाठी मोलाचे योगदान

भाजपचे एक सामान्य आणि प्रामाणिक कार्यकर्ते अशी आदरणीय राजेंद्र आर्लेकर यांची ओळख आहे.गोव्यात भाजपची पाळेमुळे घट्ट करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिल्याचे सर्वांना मान्य आहे. भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी भाजप संघटन मजबूत केले. आमदार, सभापती ते पंचायत मंत्री पदाची त्यांची कारकीर्द वादरहित ठरली आहे. यावरून त्यांच्या स्वच्छ कारभाराची प्रचिती येते. असे सभापती राजेश पाटणेकर यांनी सांगून, राज्यपाल पदाची घटनात्मक जबाबदारी ते समर्थपणे सांभाळतील असा विश्वास व्यक्त केला. आदरणीय आर्लेकर यांचे सभापती पाटणेकर यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छाही व्यक्त केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com