fire.jpg 
गोवा

...तर कुंकळ्ळीतील त्‍या तरुणाचा जीव वाचला असता?

दैनिक गोमंतक

कुंकळ्ळी: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत असलेल्या ऑक्सिजन प्लांटमध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्याने सुधीर कुमार या 26 वर्षीय कामगाराचा मृत्‍यू होण्‍याची घटना आज संध्याकाळी घडली. कुंकळ्ळी पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. तसेच तेथे काम करणारे अन्य दोघे कामगार जखमी झाले.( A 26 year old worker died in cylinder exploded at Kunkalli industrial estate)

कुंकळ्ळी (Kunkalli) पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार कुंकळ्‍ळी औद्योगिक वसाहतीत असलेल्या ऑक्सिजन प्लांटमध्ये रिकामी सिलिंडर भरण्याचे काम करण्यात येत होते. आज दुपारी दररोजच्यासारखे सिलिंडर भरून एका ठिकाणी ठेवण्यात आले होते. अचानक एका सिलिंडरचा स्‍फोट (Cylinder blast) झाला व तेथे काम करीत असलेल्‍या सुधीर नामक कामगाराच्या डोक्याला सिलिंडरचे झाकण जोरदार येऊन आपटल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला इस्पितळात नेताना त्याचा मृत्यू झाला. कुंकळ्ळी पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केला आहे. 

...तर त्‍याचा जीव वाचला असता?
सुरक्षारक्षकाने दिलेल्या माहितीनुसार मृत झालेला कामगार सुमार दीड तास जखमी अवस्थेत तडफडत होता. त्‍याला त्‍वरित इस्पितळात हलविले असते तर त्याचा जीव वाचला असता. मृत झालेल्‍या कामगाराचे दीड वर्षांपूर्वीच लग्न झाले होते व त्याला एका महिन्याचा मुलगा असल्याची माहिती मयताच्या ओळखीच्या कामगारांनी 
दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ Test Series: न्यूझीलंडच्या भूमीवर टीम इंडियाचा चिंता वाढवणारा कसोटी रेकॉर्ड, 58 वर्षांत केवळ 2 मालिका विजय; गिल सेनेपुढे इतिहास बदलण्याचे मोठे आव्हान

कुलगाममधील CRPF पथकावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा; लष्कर-ए-तैयबाचा कमांडर लतीफ भटसह दोन दहशतवादी चकमकीत ढेर

Rajat Patidar Century: 13 षटकार, 8 चौकार, 281 चा स्ट्राईक रेट! तडाखेबंद शतक ठोकून रजत पाटीदारने रचला नवा इतिहास; गोलंदाजांची उडवली झोप

मुंबईत रंगला 'गली क्रिकेट'चा थरार! प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटनला क्रिकेटच्या देवाने दिले फलंदाजीचे धडे; व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: पुन्हा एकदा रंगणार भारत-पाक महामुकाबला! हिसाब चुकता करण्यास टीम इंडिया सज्ज; हाय-व्होल्टेज लढतीकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष

SCROLL FOR NEXT