Goa Medical College | organ donation Dainik Gomantak
गोवा

GMC Organ Donation: गोव्यात ब्रेन डेड युवकाचे अवयवदान, देशाच्या तीन शहरातील चौघांना जीवदान

ब्रेन डेड व्यक्तीचे अवयव दुसऱ्याला देण्याची गोमेकॉतील ही चौथी वेळ आहे

दैनिक गोमन्तक

25 Yr Old Brain Dead Youth Donate Organ: गोवा वैद्यकीय महाविद्यालयात मेंदूने काम करणे थांबवलेला (ब्रेन डेड) रुग्ण (वय २५ वर्षे) दोन मूत्रपिंडे, यकृत आणि हृदय यांच्या रूपाने पृथ्वीतलावर राहणार आहे. त्याच्या शरीरातून हे अवयव काढले असून प्रत्यारोपणासाठी ते रवानाही केले आहेत.

अशा ब्रेन डेड व्यक्तीचे अवयव दुसऱ्याला देण्याची गोमेकॉतील ही चौथी वेळ आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये असे अवयवदान केले होते. गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांनी ही माहिती दिली.

डॉ. बांदेकर म्हणाले की, गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता प्रा. डॉ. सनत भाटकर आणि साहाय्यक प्राध्यापक डॉ. रुक्मा कोलवाळकर यांच्या पथकाने त्या रुग्णाच्या मेंदूने काम करणे थांबवल्यावर शिक्कामोर्तब केले.

तो रुग्ण अपघातात गंभीर जखमी झाला होता आणि तीन दिवस अतिदक्षता विभागात उपचार घेत होता. मेंदूने काम करणे थांबवल्यावर सर्वसाधारणपणे तीन दिवसांनंतर हृदय काम करणे थांबवते.

त्या काळातच अवयव दानाविषयी निर्णय घ्यावा लागतो. त्याची फुप्फुस्से सक्षम नसल्याने ती दान करता येत नव्हती. मात्र, उर्वरित अवयव दान करता येतील, याची कल्पना नातेवाईकांना दिली आणि त्यांनी होकार दिला त्यामुळे हे सारे शक्य झाले.

अवयवदानाची प्रक्रिया

ब्रेन स्टेम या शरीराच्या भागाने काम करणे बंद केले की, त्यातून रुग्ण वाचू शकत नाही. त्या रुग्णाला ‘ब्रेन डेड’ घोषित करावे लागते. त्याचीही एक प्रक्रिया आहे. ती करून प्रमाणपत्र दिले की, तो रुग्ण अवयवदानास पात्र ठरतो.

त्याच्या नजीकचे नातेवाईक त्याविषयी नंतर निर्णय घेऊ शकतात. अवयव कोणाला द्यावे, याचेही निकष आहेत. त्यासाठी राज्य, विभाग आणि राष्ट्रीय पातळीवर कार्यरत संघटनेकडून (सोटो, रोटो आणि नोटो) कार्यवाही केली जाते. सारे काही त्यांच्या संकेतस्थळावर नोंदवून करावे लागते.

चेन्नई, दिल्लीला रवाना

त्याच्या दोन मूत्रपिंडांपैकी एका मूत्रपिंडाचे रोपण गोमेकॉतच ३१ वर्षीय रुग्णावर, तर दुसऱ्या मूत्रपिंडाचे रोपण हेल्थवे इस्पितळात ४५ वर्षीय रुग्णावर होणार आहे.

मूत्रपिंडासाठी राज्यात अद्याप ४१ जण प्रतीक्षा यादीत आहेत. अवयव दान करण्यासाठी रक्तगट जुळण्यापासून अनेक गोष्टी पडताळून पाहाव्या लागतात. गुरुवारी रात्रभर डॉक्टर आणि परिचारिकांनी हे काम अविश्रांतपणे केले.

हृदय चेन्नई येथील एमजीएम इस्पितळात 30 वर्षीय रुग्णाला दिले जाणार आहे, तर यकृत दिल्लीला पाठवले आहे. हा रुग्ण बेळगावातील असल्याने पार्थिव तिकडे नेऊन अंत्यसंस्काराची जबाबदारी गोमेकॉने उचलली आहे.

ग्रीन कॉरिडॉर

हे अवयव राज्याबाहेर नेण्यासाठी वाहतूक पोलिस आणि प्रशासनाच्या मदतीने गोमेकॉ ते दाबोळी विमानतळ आणि गोमेकॉ ते हेल्थवे इस्पितळ या दरम्यान ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला होता.

वाहतूक पोलिसांनी अवयव वाहतूक सुलभ केली, असे डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT