ओकांब-धारबांदोडा येथील दूधसागर नदीत एकजण बुडाल्याची दुर्घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. मूळ उत्तर प्रदेश राज्यातील पण सध्या तिस्क - उसगाव येथे राहणारा सिद्धू मितेश मिश्रा (24) हा युवक दूधसागर नदीत बुडाला असून त्याचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. बेपत्ता युवकाचा शोध घेण्यात येत आहे. (24-year-old youth drowns in Dudhsagar river)
सिद्धू मिश्रा आणि अन्य पाचजण रविवार सुटीचा दिवस असल्याने मौजमजा करण्यासाठी संजीवनी साखर कारखान्यामागे दूधसागर नदीजवळ आले होते. ओकांब येथे नदीत उतरल्यानंतर सिद्धू मिश्रा गटांगळ्या खाऊ लागला आणि पाण्यात दिसेनासा झाला. त्याला वाचवण्याचे प्रयत्नही फोल ठरले.
त्याच्या सहकाऱ्यांनी व इतरांनी या प्रकाराची माहिती पोलिस व फोंडा अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्यात बुडालेल्या सिद्धूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण तो रात्री उशिरापर्यंत सापडू शकला नाही. सिद्धू हा उत्तर प्रदेशमधील गढवा-देवारिया येथील रहिवासी असून तो घोटमोड-तिस्क, उसगाव येथील नेस्ले कंपनीत कामाला होता. सध्या त्याचे वास्तव्य तिस्क-उसगाव येथेच होते. सिद्धू पाण्यात बुडाल्याची माहिती त्याच्या गावी कुटुंबीयांना दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.पोलिसांसह अग्निशामक दलाला दिली.
दरम्यान, दाभाळ येथे दूधसागर नदी ठिकाणी फिरायला गेलेल्या बातोडा येथील युवकाचा काहीदिवसांपूर्वी बुडून मृत्यू झाला होता. तर त्याच्या साथीदाराला वाचवण्यात यश आले होते. मात्र त्याला गंभीर स्थितीत पाण्यातून बाहेर काढून गोमेकॉत दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस दूधसागर (Dudhsagar) य़ेथील घटनास्थळी दाखल झाले होते, नदीत बुडालेल्या तरूणाचा पोलिसांनी (police) शोध घेऊन त्याचा मृतदेह रूग्णालयात हलवण्यात आला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.