arrest Dainik Gomantak
गोवा

Quepem Crime News : अंघोळ करताना युवतीचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याप्रकरणी केपेतील युवकाला अटक

विनयभंगाचा गुन्हा दाखल

गोमन्तक डिजिटल टीम

Quepem Crime News : केपे येथे एका युवतीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. युवकाने केपेतील युवतीचा अंघोळ करीत असताना चोरून मोबाइल द्वारा व्हिडिओ चित्रिकरण करत विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी केपे पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे.

केपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 16 रोजी संध्याकाळी 7.45 वाजता एका अनोळखी व्यक्तीने आपण आंघोळ करीत असताना चोरून व्हिडिओ चित्रीकरण केल्याची तक्रार सदर युवतीने 17 रोजी केपे पोलीस स्थानकात दाखल केली होती. त्यानुसार केपे पोलिसांनी त्वरित तपास करीत याप्रकरणी बामणभाट आंबावली केपे येथील एलिस्टन कार्दोज (24) याला अटक केली.

अशीच एक विनयभंगाची घटना ताळगाव येथे घडली होती. येथील एका महिला वसतिगृहात विद्यार्थिनीचा आंघोळ करताना व्हिडिओ काढल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी सिप्सन सिप्रियानो गोम्स (२५. व्हडलेभाट- ताळगाव) या युवकाला अटक केली होती.

अटक करण्यात आलेल्या संशयिताला पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने 25 हजार रूपयांच्या व इतर अटींवर सुटका केली होती. पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीने तक्रार दाखल केली आहे.

त्यानुसार, सदर तक्रारदार महिला वसतिगृहात गुरूवार 13 रोजी सायंकाळी 6.45 वाजता आंघोळ करताना संशयित सिप्सन सिप्रियानो गोम्स याने मोबाईलवर व्हिडिओ केल्याचे म्हटले आहे. त्यानंतर याप्रकरणी आरडाओरडा केल्यानंतर इतर विद्यार्थिनींनी संशयिताला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. अटक करण्यात आलेल्या

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'झुरळ' शब्दाने भडकवला बेरोजगारांचा वणवा! 'कॉक्रोच जनता पार्टी'ने हादरवली दिल्ली

फेब्रुवारीतील इशारा ऐकला असता तर... सरकारवर नामुष्कीची आणि लाखो मुलांच्या जीव टांगणीला लागण्याची वेळ आली नसती; CBSE चा 'महा'घोटाळा चव्हाट्यावर!

Goa ST Reservation: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाचे डोळे दिल्लीकडे, गोव्यात आरक्षणाचा सर्वात मोठा सस्पेन्स; अमित शहा आठवडाभरात भूमिका करणार स्पष्ट?

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

SCROLL FOR NEXT