BITS Pilani, Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील 'बीआयटीएस पिलानी' कॅम्पसमध्ये आढळले 24 कोरोनाबाधित

कॅम्पसमधील लक्षणे असलेल्या लोकांची चाचणी केली जात आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: झुआरीनगर येथील बीआयटीएस पिलानी (BITS Pilani) कॅम्पसमध्ये 24 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये बहुतेक विद्यार्थी आहेत, तर उर्वरीत स्टाफ मेंबर आहेत. याबाबत बोलताना राज्य महामारी तज्ज्ञ डॉ. उत्कर्ष बेटोडकर यांनी माहिती दिली की, खाजगी संस्थेत 25 मार्च रोजी कोविड-19 चा पहिला रुग्ण आढळून आला होता. पुढे गुरुवारी 9 नवीन रुग्ण सापडले. (24 people infected with covid-19 in bits pilani goa)

"सर्व 24 जण कॅम्पसमधील त्यांच्या वैयक्तिक वसतिगृहाच्या खोल्यांमध्ये विलगीकरणात आहेत. त्यापैकी कोणालाही आतापर्यंत रुग्णालयात (Hospital) दाखल करण्याची गरज भासलेली नाही. कॅम्पसमधील लक्षणे असलेल्या लोकांची चाचणी केली जात आहे," डॉ. बेतोडकर म्हणाले.

राज्य महामारी तज्ज्ञ म्हणाले की, आरोग्य सेवा संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाने परिसरात विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय केले आहेत. आम्ही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि प्रोटोकॉलनुसार सर्व पावले उचलत आहोत.

दरम्यान, गेल्या दोन आठवड्यांपासून ताज्या प्रकरणांमध्ये सातत्याने घसरण झाल्यानंतर, गोव्यात (Goa) गुरुवारी 2.02% च्या सकारात्मक दराने कोविड-19 च्या 12 नवीन प्रकरणांची नोंद झाली.

गोव्यात कोविडची पुष्टी झालेली 2,45,300 प्रकरणे आहेत, ज्यापैकी सध्या 29 सक्रिय प्रकरणे आहेत, तर 2,41,439 रुग्णांनी प्राणघातक आजारावर मात केली आहे. आत्तापर्यंत राज्यात कोविड-19 (COVID-19) मुळे 3,832 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT