Nilesh Cabral
Nilesh Cabral Dainik Gomantak
गोवा

'गोव्यातील जनतेला चोवीस तास पाणीपुरवठा करणे अशक्य'

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यातील एकूण पाण्याची मागणी आणि पुरवठा लक्षात घेतला तर सद्यस्थितीत जनतेला 24 तास पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याची स्पष्ट कबुली सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पाणी टंचाईबाबत पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी नीलेश काब्राल म्हणाले की, राज्यात पाणीसाठा मुबलक असला तरी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये वीज भारनियमनामुळे पाणीपुरवठा करण्यावर मर्यादा येतात. याशिवाय उन्हाळ्यात पाण्याची मागणीही वाढते. त्यामुळे यादरम्यानच्या काळात पाणी जपून वापरले पाहिजे. सध्या राज्यातील पाणीपुरवठा आणि जनतेकडून होणारी मागणी यांचा विचार करता 24 तास पाणी देणे शक्य नाही.

जास्तीत जास्त तीन ते चार तास पाणी देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. काही ठिकाणी पाण्याची मागणी जास्त आहे. मात्र, शुद्ध पाणी पुरवणे शक्य होत नाही. भार नियमनामुळे जलस्रोत खात्याकडून कच्च्या पाण्याचा मर्यादित पुरवठा झाल्यास शुद्ध पिण्याचे पाणीही पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. याचा एकूणच पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे, असे नीलेश काब्राल म्हणाले.

सध्या उत्तर गोव्यातील बार्देश आणि पेडणे तालुक्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई असून किनारपट्टी भागातील अनेक गावांना एक दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे अगदी पर्यटनाच्या हंगामामध्ये पाणी नसल्याने नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे किनारी भागातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News : अवाजवी शुल्क आकारणाऱ्या शैक्षणिक संस्‍था निशाण्यावर; मुख्‍यमंत्र्यांनी दिला कडक कारवाईचा इशारा

Panaji News : दहावी झाली, आता पुढे काय? स्मार्ट निर्णय घ्या; व्यावसायिक, औद्योगिक संस्थांचे पर्याय

PM Modi Interview: ‘’पाच वर्षे राजकारण करु नये’’: पंतप्रधान मोदींची बेधडक मुलाखत; प्रत्येक प्रश्नांची दिली दिलखुलास उत्तरे

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

SCROLL FOR NEXT