मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी ‘स्टार्टअप’शी साधला संवाद

स्टार्टअपना लागणारी मदत सरकारमार्फत देण्याचा प्रयत्न करण्याचंही बाबूशचं आश्वासन
Babush Monserratte
Babush MonserratteDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : विज्ञान व तंत्रज्ञानाचे मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी फातोर्डा येथील डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट देत ‘स्टार्टअप’शी संवाद साधला. मंत्री मोन्सेरात यांनी महाविद्यालय स्थित फोरम फॉर इंकुबेशन, रिसर्च ॲण्ड एन्टरप्रनरशीप केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार विजय सरदेसाई, गोवा राज्य इनोव्हेशन कौन्सिलचे चेअरमन जुझे मॅन्युएल नोरान्हा, विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे सचिव डॉ. तारीक थॉमस उपस्थित होते.

Babush Monserratte
'गोव्यातील जनतेला चोवीस तास पाणीपुरवठा करणे अशक्य'

गोव्यात स्टार्टअपच्या कार्यक्षेत्रात जास्त सुधारणा होणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांच्या अनुदानात वाढ करणे क्रमप्राप्त ठरते, असे मंत्री मोन्सेरात यांनी सांगितले. या केंद्रामधील उपक्रमांची त्यांनी माहिती करून घेतली. मंत्री मोन्सेरात यांनी प्रोटोटाईपिंग प्रयोगशाळेला भेट देऊन थ्री डी प्रिंटींग तंत्रज्ञानाची माहिती करून घेतली.

स्टार्टअप्सचा संबंधाने मी विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार आणि मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार असल्याचे आमदार विजय सरदेसाई यानी सांगितले.

Babush Monserratte
प्रतापसिंग राणे यांना दिला अखेर कॅबिनेट दर्जा

अभियांत्रिकी महाविद्यालयाने जी प्रगती केली आहे ती पाहून आनंद होत आहे. येथील प्रयोगशाळा केंद्रात आणखी उपक्रम सुरू करायला हवेत व त्यासाठी जास्त अनुदानाची गरज असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. ज्याप्रकारे डॉन बॉस्को महाविद्यालयाचे व्यवस्थापन या केंद्राची देखरेख करीत आहे ते अगदी प्रशंसनीय आहे. जी काही मदत लागेल ती सरकारमार्फत देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com