Loksabha Election 2024 Dainik Gomantak
गोवा

Goa Police: 238 वॉरंट, 41 शस्त्रे जमा; गोवा पोलिसांची लोकसभेच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई

Goa Police: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

Pramod Yadav

Goa Police Loksabha Election

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी 200 हून अधिक गुन्हेगार आणि असामाजिक घटकांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली.

गोवा पोलिसांकडून 238 अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले असून, 16 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान 41 परवानाधारक शस्त्रे जमा करण्यात आली आहेत.

प्रतिबंधात्मक कारवाईचा भाग म्हणून, 146 इतरांना CrPC च्या कलम 107 अंतर्गत सुरक्षा बॉन्ड सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याचे उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल म्हणाले.

तसेच, CrPC च्या कलम 110 अंतर्गत 60 लोकांना सतर्क करण्यात आले आहे, तर 11 लोकांना CrPC च्या कलम 109 अंतर्गत सावध करण्यात आले आहे.

राज्यातील दोन्ही जिल्ह्यात जवळपास 100 गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी गुन्हेगारांना पोलिस स्थानकात बोलवून गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी न होण्याची सूचना केली आहे.

निवडणूक काळात काही अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास सक्त कारवाई केली जाईल, असा ताकीद वजा इशारा पोलिसांनी दिला आहे. सीमा भागातील तपासणी नाक्यावर कसून तपास केला जात असून, अमली पदार्थांच्या तस्करीवर लक्ष ठेवले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश आल्यानंतर याबाबत कारवाई करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: रेल्वे ट्रॅकवर बसलेल्या आजोबांचा थरारक व्हिडिओ व्हायरल, थोडक्यात बचावले; नेटकरी म्हणाले, 'बाबांचं यमराजासोबत उठणं-बसणं दिसतयं!'

IND vs AUS 2nd ODI Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार दुसऱ्या वनडेचा थरार! फ्रीमध्ये लाईव्ह मॅच कधी, कुठे आणि कशी पाहायची? जाणून घ्या!

"तो फक्त सेटिंग करतो, गोव्याला लुटायला आलाय", हणजूण किनारा वाद; मंत्री लोबो यांचा परबांवर शाब्दिक हल्ला

गोसेवेसाठी गोशाळांना मदत करण्यास सरकार तत्पर; Watch Video

IND vs AUS ODI Playing XI: मालिका वाचवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा आऊट? दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार मोठा बदल

SCROLL FOR NEXT