Farhan Akhtar at Chapora Fort Goa Instagram
गोवा

Farhan Akhtar at Goa: 'दिल चाहता है' नंतर 23 वर्षांनी फरहान अख्तर गोव्यातील शापोरा किल्ल्यावर...

फरहान म्हणतो, काही ठिकाणे जादुई असतात...

Akshay Nirmale

Farhan Akhtar at Chapora Fort Goa: बॉलीवूडमधील दुसरा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जात असलेल्या दिग्दर्शक, अभिनेता, लेखक, निर्माता, गायक फरहान अख्तर च्या ताज्या गोव्या भेटीमुळे अनेकांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.

फरहान अख्तर गोव्यातील शापोरा किल्ल्यावर आला आहे. विशेष म्हणजे जेव्हा फरहान अख्तरने त्याच्या फिल्मी कारकिर्दीची सुरवात केली होती तेव्हा तो गोव्यात आला होता.

फरहान अख्तरने दिग्दर्शनातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता 'दिल चाहता है.' या चित्रपटाचे आणि गोव्याचे मोठे कनेक्शन आहे.

गोव्यातील अनेक ठिकाणे याचित्रपटात दिसतात. पण या चित्रपटातील तीन मित्रांच्या भूमिकेत असलेले आमीर खान, अक्षय खन्ना आणि सैफ अली खान हे तिघे गोव्याला येतात आणि येथील शापोरा किल्ल्यावर जातात. शापोरा किल्ला या चित्रपटापासून खूप नावारूपाला आला.

अगदी या किल्ल्याला दिल चाहता है किल्ला असेही म्हटले जाते. तर या चित्रपटानंतर तब्बल 23 वर्षांनी फरहान अख्तरने रविवारी, 10 डिसेंबर रोजी पुन्हा शापोरा किल्ल्याला भेट दिली आहे. हा चित्रपट 2001 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

फरहान अख्तरने नुकतेच शापोरा किल्ला भेटीचा एक फोटोही सोशल मीडियात शेअर केला आहे.

फरहानने या फोटोसोबत लिहिले आहे की, 'आकाश, सिड आणि समीर आयुष्याविषयी बोलत असल्याचे चित्रीकरण केल्यानंतर प्रथमच शापोरा किल्ल्यावर परतलो.

ते 23 वर्षांपूर्वी झाले होते. बरेच काही बदलले आहे, परंतु गोव्याची उबदार, समुद्री खारट हवा तशीच आहे. काही ठिकाणे अगदी जादुई असतात.'

फरहानच्या या पोस्टवर त्याची पत्नी शिबानी दांडेकर हीने हार्ट इमोजीसह 'जादुई फ्रेममध्ये माझे 2 आवडते लोक' अशी कॉमेंट केली आहे. अभिनेता हर्षवर्धन कपूरने रेड हार्ट इमोजी शेअर करत लिहिले आहे की, 'काही गोष्टी कायमसाठी असतात.'

दरम्यान, फरहानच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी या दिल चाहता है चित्रपटाच्या सीक्वेलची मागणी केली आहे. 'दिल चाहता है' या चित्रपटाला 49 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये दोन पुरस्कार मिळाले होते. हिंदीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म हा पुरस्कारही त्यात होता. '

दरम्यान, आगामी काळात फरहान पुन्हा दिग्दर्शकाच्या खुर्चीत दिसेल. तो रणवीर सिंगला घेऊन 'डॉन 3' करत आहे तर त्याच्या 'जी ले जरा'मध्ये कॅटरिना कैफ, आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रा दिसणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Astrology Today: बुधादित्य योगामुळे धनलाभ आणि नव्या संधी; वृषभ, मिथुनराशीसोबत 'या' लोकांसाठी अत्यंत लाभदायक दिवस

Colvale Jail: कोलवाळ कारागृहाला ‘मानवाधिकार’ने फटकारले! शौचालयांमध्ये दरवाजांचा अभाव; जॅमरसह सीसीटीव्‍हींची शिफारस

Goa Politics: खरी कुजबुज; भाऊ, कशी होणार रे विरोधी आघाडी!

Goa live News: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाच्या नवीन अधीक्षक म्हणून सुचेता बी. देसाई यांची नियुक्ती

Goa Crime: हॉटेल रेटिंग करा, पैसे मिळवा! गोव्यातील महिलेला 3 लाखांचा गंडा; संशयिताला राजस्थानमधून अटक

SCROLL FOR NEXT