54th International Film Festival India Goa Dainik Gomantak
गोवा

54th IFFI: ‘नवा रंग नवा साज’

54th IFFI: ‘इफ्फी’ची लगबग सुरू 225 कारागीर रात्रंदिवस कार्यरत

दैनिक गोमन्तक

54th IFFI: राज्यात 18 वर्षांपासून आयोजित केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) यंदाचे 19 वे वर्ष आहे. दरवर्षी महोत्सवाची संकल्पना व थीम वेगवेगळी असते. मागील वर्षी संगीत वाद्य व चित्रपटातील मोर (म्युझिकल इन्स्ट्रमेंट अँड फिल्म पिकॉक) ही संकल्पना अनुभवल्यानंतर यंदा ‘सेलिब्रेट द जॉय ऑफ सिनेमा’ याला अनुसरून कला, संस्कृती, विविधता, सांस्कृतिक चैतन्य आणि चित्रपट दर्शवणारा मोर साकारला जात आहे.

20 ते 28 नोव्हेंबरदरम्यान गोव्यात इफ्फी होत असून यासाठी पणजीसह ठिकठिकाणी सजावट आणि रोषणाई केली जाणार आहे. गेल्या चार वर्षांपासून या सजावटीची निविदा पणजीच्या विनायक डेकोर यांना मिळते. महोत्सव अवघ्या 12 दिवसांवर असल्याने राज्यभर ही सजावट साकारण्यासाठी विनायक डेकोरेटर्सचे सव्वादोनशेहून अधिक कारागीर रात्रंदिवस काम करत आहेत.

या महोत्सवासाठी 15 ठिकाणी स्वागत कमानी आणि 5 ठिकाणचे सर्कल सुशोभीत करण्यात येणार आहेत. यात मिरामार, दिवजा, कळंगुट, अंजुणा केटीसी या सर्कलचा समावेश आहे. राज्याची कला आणि संस्कृती, कलात्मक आविष्काराच्या रूपात साकारण्यात ‘विनायक डेकोरेटर्स’ अग्रगण्य आहेत.

मी गेली चार वर्षे ही सजावट साकारत असलो तरी प्रत्येक वर्षीची संकल्पना वेगळी असते. त्यामुळे संपूर्ण ‘डेकोर’ नव्याने साकारावा लागतो. यंदाही तो सुबकरीतीने साकारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. स्वयंपूर्ण गोव्याच्या संकल्पनेचा आम्हाला फायदा झाला असून यंदाचा डेकोर सेलिब्रिटी, प्रतिनिधीपासून गोवेकरांच्याही पसंतीला पडेल याची खात्री आहे.
- सिद्धेश देसाई, (प्रो.) विनायक डेकोरेटर्स

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT