Goa Weather Canva
गोवा

Cyclone Dana: गोव्यात दोन दिवस 'यलो अलर्ट'! बंगालच्या खाडीत चक्रीवादळाचा परिणाम?

Goa Rain: मान्‍सूनने माघार घेतल्‍यानंतरही राज्‍यात गेल्‍या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढतच चालला आहे. दीपावली तोंडावर आली असताना पावसाने जोर धरल्‍याने लोकांच्‍या उत्‍साहावर विरजण पडू लागले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Cyclone Dana Impact On Goa

पणजी: मान्‍सूनने माघार घेतल्‍यानंतरही राज्‍यात गेल्‍या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढतच चालला आहे. दीपावली तोंडावर आली असताना पावसाने जोर धरल्‍याने लोकांच्‍या उत्‍साहावर विरजण पडू लागले आहे. विशेषत: नरकासुर प्रतिमा बनविणाऱ्यांची धांदल उडत आहे.

कर्नाटक आणि तामिळनाडूच्या पट्ट्यात चक्रीय वारे तसेच ईशान्य मान्सूनचा प्रभाव आहे. बंगालच्या खाडीत २३ ऑक्टोबरपर्यंत चक्रीवादळ धडकण्‍याची शक्‍यता आहे. पुढील दोन दिवस राज्यात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील, तसेच मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्‍यात आली आहे.

मंगळवारी आणि बुधवारी राज्यात गोवा वेधशाळेतर्फे ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.दरम्‍यान, राज्‍यात दुपारच्‍या वेळी तापमान खूपच वाढत असल्‍यामुळे लाेकांना घराबाहेर पडणे कठीण होऊन बसले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT