HIV AIDS In Goa Dainik Gomantak
गोवा

World AIDS Day 2022 : या वयोगटातील व्यक्तींनी एकदा तरी चाचणी कराच!

HIV AIDS In Goa : गोव्यात 2022 च्या पहिल्या दहा महिन्यांत 209 HIV पॉझिटीव्ह प्रकरणे आढळली आहेत.

दैनिक गोमन्तक

HIV AIDS In Goa : एड्स हा ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (HIV) च्या संसर्गामुळे होणारा आजार आहे. हा विषाणू संक्रमित रक्त, वीर्य आणि योनीमार्गातील द्रव्यांच्या संपर्कात आल्याने पसरतो. 1 डिसेंबर हा दिवस जगभरात 'जागतिक एड्स दिन' (World AIDS Day 2022) म्हणून साजरा केला जातो. 

गोव्यात 2022 च्या पहिल्या दहा महिन्यांत 209 HIV पॉझिटीव्ह प्रकरणे आढळली आहेत. याचबरोबर 196 सामान्य प्रकरणेही समोर आली आहेत. 40% प्रकरणांमध्ये एचआयव्ही संसर्गाचे कारण जागरुकतेच्या अभावामुळे पसरत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे, DHS संचालिका गीता काकोडकर यांनी 13 वर्षे ते 64 वर्षे वयोगटातील लोकांना सावधगिरीचा उपाय म्हणून एकदा तरी संसर्गाची चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

गोवा एड्स कंट्रोल सोसायटीतर्फे आज पणजीमध्ये जागतिक एड्स दिनचे आयोजन करण्यात आले होते. सोसायटीने सादर केलेल्या अहवालानुसार, गोव्यात 1987 पासून ऑक्टोबर 2022 पर्यंत एकूण HIV+ प्रकरणांची संख्या 17,996 आहे.

गोवा SACS मध्ये 2022 पर्यंत एकूण 1,873 एड्सची प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि सप्टेंबर 2022 पर्यंत AIDS संबंधित मृत्यूंची नोंद 1,274 इतकी आहे. एचआयव्ही संसर्ग गोव्याच्या सर्व भागांमध्ये दिसून आला आहे.

2021 मध्ये दक्षिण गोव्यात मुरगावमध्ये 17%, सासष्टीमध्ये 13.4% आणि बार्देशमध्ये 19.2% आणि उत्तर गोव्यातील तिसवाडी तालुक्यात 12.1% AIDS संबंधित प्रकरणे समोर आली. यामुळे सर्वांनी AIDS बाबत खबरदारी घेण्याचे आवाहन काकोडकर यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: कासवाडा- तळावली येथे घरावर कोसळले वडाचे झाड

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT