Cannes Film Festival Dainik Gomantak
गोवा

Cannes Film Festival : ‘कान्स’मध्ये झळकले ५५ व्या इफ्फीचे पोस्टर; ‘भारत पर्व’ ठरले सोहळ्याचे आकर्षण

Cannes Film Festival : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू या पहिल्या वहिल्या ‘भारत पर्व महोत्सवा’त सहभागी झाले होते. प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या हस्ते इफ्फीच्या पोस्टर्सचे अनावरणही झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Cannes Film Festival :

पणजी, चित्रपट जगतातील सर्वात भव्य मानल्या जाणाऱ्या कान्स चित्रपट महोत्सवाला दोन दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात सुरवात झाली. या महोत्सवाचे यंदाचे ७७ वे वर्ष असून यावर्षी होणाऱ्या ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) पोस्टरचे (भित्तीपत्रक) अनावरण झाले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू या पहिल्या वहिल्या ‘भारत पर्व महोत्सवा’त सहभागी झाले होते. प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या हस्ते इफ्फीच्या पोस्टर्सचे अनावरणही झाले.

यावेळी चित्रपट निर्माते अशोक अमृतराज, रिची मेहता, गायक शान, अभिनेता राजपाल यादव, चित्रपटसृष्टीतील दिग्गज बॉबी बेदी हे मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ अर्थात एनएफडीसीने फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अर्थात फिक्कीच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमात गायिका सुनंदा शर्मा यांच्यासह, नवोदित गायिका प्रगती, अर्जुन आणि गायक शान यांचा मुलगा माही यांनी पंजाबी गीतांचे सादरीकरण केले. यानंतर सगळ्या गायकांनी सादर केलेल्या ‘माँ तुझे सलाम’ या गाण्याने कार्यक्रमाची जोषपूर्ण सांगता झाली.

उपस्थितांनी या गाण्याला टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली. दहा दिवस चालणाऱ्या या चित्रपट महोत्सवात चित्रपटप्रेमींना आशय आणि ग्लॅमरचा मेळा अनुभवायला मिळणार आहे.

हा अत्यंत आनंदाचा क्षण

कान्स चित्रपट महोत्सवातील ‘भारत पॅव्हेलियन’मध्ये सहभागी होणे आनंददायी होते. हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. गेल्या वर्षी आम्ही या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते, तेव्हा आम्ही पुढील वर्षी कान्समध्ये असू याची कल्पना नव्हती, असे अभिनेत्री मिता वशिष्ठ हिने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 22 July 2026: कुणाला धनलाभ, तर कुणाला मानसिक ताण! आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट; 'या' राशींचे चमकणार तारे

Double Murder Case: रक्ताचे नाते ठरले वैरी! दोन पोटच्या मुलांनीच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

Operation Sindoor: पाक लष्कराचे पितळ उघडे! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचाच पराभव; इम्रान खान यांच्या बहिणीच्या दाव्यानं खळबळ

Pakistan Heavy Rain: पाकिस्तानात पावसाचा हाहाकार! खैबर पख्तूनख्वामध्ये पूर अन् भिंती कोसळून 12 जणांचा मृत्यू; 5 बालकांचा समावेश

India vs Zimbabwe T20: श्रेयस अय्यरची 'अग्निपरीक्षा'! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा; पाहा संपूर्ण संघ अन् वेळ

SCROLL FOR NEXT