Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: कोयता-दांडक्याने मारहाण करून दिली जीवे मारण्याची धमकी, जखमी अवस्थेत केली तक्रार; पुराव्याअभावी दाम्पत्य निर्दोष

Goa Crime News: नितीन केरकर आणि त्यांची पत्नी पूजा केरकर (नायगीनवाडा, पार्से) यांच्याविरोधात आयपीसी कलम ३२४, ५०६(२) आणि ३४ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: अंगावर जखमा होत्या आणि दीपाली केरकर ह्या रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडल्या होत्या. अशा स्थितीत त्यांनी पेडणे पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी घरी येऊन त्यांना ‘गोमेकॉ’ त उपचारासाठी नेले होते. डॉक्टरांनीही त्यावर शिक्कामोर्तब केले. तरीही २०१८ मध्ये झालेल्या या जीवघेण्या हल्ल्याचा पुरावा न्यायालयात सादर करण्यात पोलिसांना अपयश आल्याने पेडणे प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकाऱ्यांनी आरोपी दाम्पत्याला निर्दोष मुक्त केले.

नितीन केरकर आणि त्यांची पत्नी पूजा केरकर (नायगीनवाडा, पार्से) यांच्याविरोधात आयपीसी कलम ३२४, ५०६(२) आणि ३४ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. ३ एप्रिल २०१८ रोजी दीपाली केरकर यांनी ही तक्रार दाखल केली होती.

या दाम्पत्याने आपल्याला कोयता आणि लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. वैद्यकीय अहवालात तक्रारदाराच्या अंगावर जखमा असल्याचे दिसून आले असले तरी, केवळ जखमांच्या आधारे त्या जखमा आरोपींनीच केल्या आहेत हे सिद्ध होऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

साक्षीदारांची वेगवेगळी विधाने

तक्रारदार दीपाली केरकर आणि तिची मुलगी यांच्या साक्षीमध्ये मोठी विसंगती दिसून आली. मारहाण नेमकी घराबाहेर बोलावून झाली की घरी परतताना झाली, याबाबत दोन्ही साक्षीदारांनी वेगळी विधाने केल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

या घटनेचा कोणताही निष्पक्ष किंवा स्वतंत्र साक्षीदार पोलिसांनी तपासला नाही. सर्व साक्षीदार हे तक्रारदार महिलेच्या जवळच्या नात्यातील होते. संबंधित दोन्ही पक्षकारांमध्ये जुना मालमत्तेचा वाद असल्याचे समोर आले आणि अशा परिस्थितीत तपासात अधिक पारदर्शकता आणि तटस्थ साक्षीदारांची गरज असल्याचे न्यायालयाने म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

Mayna Construction Project: बांधकाम प्रकल्पाविरोधात मोर्चा, मायणावासीय आक्रमक; कुडतरी पंचायतीवर धडक

iPhone 17 Pro वर भन्नाट डील! 1.34 लाखांचा फोन फक्त 56,990 रुपयांत, जाणून घ्या ऑफर

"पीओके तात्काळ खाली करा!" UN च्या मंचावरुन भारताचा पाकिस्तानला सज्जड दम; मानवाधिकार परिषदेत दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांचे धुडकावले दावे

SCROLL FOR NEXT