Goa State Electricity Department Policy Dainik Gomantak
गोवा

ऑन ड्यूटी लाईनमनचा मृत्यू झाल्यास मिळणार 'एवढ्या' लाखांची मदत; गोवा सरकारचा मोठा निर्णय

Goa Lineman Accident Compensation: ड्यूटीवर असताना अनेकदा विजेच्या धक्क्याने किंवा खांबावरुन पडून लाईनमनचा मृत्यू होतो. अशा घटना अनेकदा मिळाल्या आहेत.

Manish Jadhav

ड्यूटीवर असताना अनेकदा विजेच्या धक्क्याने किंवा खांबावरुन पडून लाईनमनचा मृत्यू होतो. अशा घटना अनेकदा मिळाल्या आहेत. पावसाळ्यात अशा घटना सर्सास पाहायला मिळतात. याच पाश्वभूमीवर आता विद्युत विभागाने मोठी निर्णय घेतला आहे.

ड्यूटीवर असताना एखाद्या लाईनमनचा मृत्यू किंवा संपूर्ण अपंगत्व आल्यास त्याला 20 लाखांची मदत देण्यात येणार आहे. होय, राज्याच्या विद्युत विभागाने यासंबंधी अधिसूचना काढली आहे.

दरम्यान, राज्याच्या विद्युत विभागाने काढलेल्या अधिसूचनेत म्हटले की, ड्यूटीवर असनाता लाईनमनचा मृत्यू किंवा संपूर्ण अपंगत्व आल्यास त्याला 20 लाखांची मदत देण्यात येईल. याशिवाय, ड्यूटीवर असताना आंशिक अपंगत्व आल्यास 11.25 लाख रुपये देण्यात येतील. "गोवा विद्युत विभाग भरपाई योजना" ही स्टेशन ऑपरेटर लाइनमन किंवा वायरमन सहाय्यक यांना लागू होईल.

विद्युत विभागाकडून त्यांच्या लाईनमन व इतर कर्मचाऱ्यांना दर दोन वर्षांनी सुरक्षेसाठीची साधने, उपकरणे पुरवली जातात. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते, असे ऊर्जामंत्री सुदिन ढवळीकर यांनी आपल्या अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात म्हटले होते.

विधानसभा अधिवेशनात, हळदोणेचे आमदार कार्लोस फेरेरा यांनी वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांना विजेच्या तारांमध्ये काम करणाऱ्या विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत अतारांकित प्रश्न विचारला होता.

विद्युत विभाग कर्मचाऱ्यांना सुरक्षेची साधने वेळेवर पुरवत आहे का, असा सवाल फेरेरा यांनी ढवळीकर यांना विचारला होता.

या प्रश्नाला उत्तर देताना ढवळीकर यांनी उत्तर दिले की, विद्युत विभाग दर दोन वर्षांनी त्यांचे लाईनमन आणि इतर कर्मचाऱ्यांना वॉटरप्रूफ टूल बॅग, सेफ्टी हेल्मेट, सेफ्टी बेल्ट्स, कटिंग प्लायर्स, स्क्रू ड्रायव्हर, लाइन टेस्टर, शॉक प्रूफ हँड ग्लोव्हज, सेफ्टी शूज अशी सुरक्षा उपकरणे वा साधने पुरवते.

शिवाय आवश्यकता असेल तेव्हा या गोष्टी पुरवल्या जातात. मंत्र्यांनी पुढे नमूद केले की, 2022 मध्ये लाईनमनला सुरक्षा उपकरणे पुरवण्यात आली होती आणि यावर्षी लवकरच नवीन टूल किट देण्यात येतील. त्यासंबंधी प्रक्रियेला सुरवात झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लहानग्या 'अमूर फाल्कन'ची थक्क करणारी भरारी! एका दिवसात 1000 किमी प्रवास करुन रचला नवा कीर्तिमान; वन्यजीव संशोधकही हैराण

Dacoity Case Goa: तोंडावर मास्क, हातात शस्त्र, घरातल्यांना केली जीवघेणी मारहाण; बायणात सव्वाकोटींचा ऐवज घेऊन 8 दरोडेखोर पसार

New Rent Rules: भाडेकरु आणि घरमालकांसाठी 'नवीन रेंट करार नियम 2025' लागू, वाद मिटवण्यासाठी विशेष न्यायालये; वाचा काय आहेत नवे नियम?

Priyanka Chopra In Goa: उकडलेला भात, कॅरम आणि बीच वॉक; प्रियांकानं शेअर केले 'गोवा व्हेकेशन'चे PHOTO, पाहून तुम्हीही व्हाल 'Chill'

FDA Raids: एफडीएची धडक कारवाई! बागा, कळंगुट परिसरात 71 आस्थापनांची तपासणी, दंडात्मक कारवाईसह काजू युनिटला ठोकले टाळे

SCROLL FOR NEXT