Sudin Dhavlikar: बार्देश रहिवाश्यांची विजेची समस्या लवकरच संपणार, वीजमंत्र्यांनी दिली 'ही' महत्वाची माहिती

वीजमंत्री ढवळीकर: पंधरा दिवसांत काढणार निविदा
Sudin Dhavlikar
Sudin DhavlikarDainik Gomantak
Published on
Updated on

Sudin Dhavlikar राज्यात अजूनही पाऊस कमी असल्याने वीज खात्यातर्फे वीज खंडित होण्याच्या वाळपई व कुंकळ्ळी या भागात खात्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वीज दुरुस्तीवर अधिक भर दिला आहे.

बार्देश तालुक्यासाठी नवीन वीज उपकेंद्र उभारण्यात येत असून त्यासाठीची निविदा येत्या पंधरा दिवसांत काढण्यात येणार आहे. त्यानंतर बार्देश भागातील विजेची समस्या कायमची संपणार आहे, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.

पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमुळे वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार घडत असतात व त्याला कोणीच काही करू शकत नाही. मात्र, खंडित होणारी वीज सुरळीत करण्यासाठी खात्याचे कार्यकारी, साहाय्यक तसेच कनिष्ठ अभियंते कामांवर नजर ठेवून आहेत.

Sudin Dhavlikar
Goa Crime: दुपट्टा किलर महानंद येणार कारागृहाबाहेर; 14 वर्षांनंतर प्रथमच मोकळीक

कुंकळ्ळी येथील भागातील लोकांना वीज खंडित होण्यामुळे त्रास सहन करावा लागला. त्यामध्ये सुधारणा झाली आहे. राज्यातील अनेक भागात भू वीजवाहिनीचे काम सुरू आहे. काही भागातून उच्च दाबाच्या वाहिनी जातात त्या जुन्या आहेत.

त्यामुळे त्यामध्ये वारंवार बिघाड किंवा तुटण्याचे प्रकार घडतात. काही ‘कंडक्टर’ही जुने झाले आहेत, त्याजागी नव्या उपकरणांची गरज आहे.

खात्याच्या प्रत्येक विभागात अधिकाऱ्यांना पावसाळ्यात खंडित होणारी वीज लवकर दुरुस्त करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत व त्यासाठी लागणाऱ्या सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

Sudin Dhavlikar
Goa Legislative Assembly Session 2023: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गोव्याबद्दल व्यक्त केलाय विश्वास; म्हणाले, 'जगातील एक प्रसिद्ध...'

कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची दक्षता

खात्याच्या लाइनमन तसेच लाईन हेल्पर या कर्मचाऱ्यांना वीज दुरुस्तीवेळी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्‍यक असलेले सामान देण्यात आले आहे. हे सामान खात्याने एप्रिलच्या अखेरीस दिले आहे.

कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भातचा प्रश्‍न खात्याचे अधिकारी हाताळत आहेत. वीज तारांवरील झुडपे तसेच झाडांच्या फांद्या कापण्याचे काम करण्यात आले आहे.

झाडे पडल्यास वीज तारा तुटण्याच्या घटना घडतील त्याला कोणी रोखू शकत नाही. खात्यातर्फे सर्व ते प्रयत्न करण्यात येत आहेत, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com