Shram-Dham Yojana Dainik Gomantak
गोवा

Shram-Dham Yojana: श्रम-धाम योजनेतून काणकोणात 20 लाभार्थींना मिळणार हक्काचे घर

दैनिक गोमन्तक

अनिल पाटील

रोजच्या संसारिक जीवनात उदरनिर्वाहासाठी उलाढाल करताना घरासारखी बाब दुय्यम ठरते. मग ते दिवास्वप्न आयुष्यभर एखाद्याला छळत राहते. अशा गरिबीत पिचलेल्यांना सभापती रमेश तवडकर यांनी आपल्या कल्पकतेने हक्काचा आसरा मिळवून दिला आहे. लोकसहभागातून त्यांनी श्रम धाम योजना सुरू केली. आज या योजनेतील २० लाभार्थ्यांना त्यांचे हक्काचे घर मिळत आहे. याबद्दल तवडकर म्हणतात, आज गरिबांना हात दिल्याचा कृतार्थ भाव मनात आहे.

राज्याच्या दक्षिण टोकावरचा काणकोण तालुका तसा दुर्गम आणि डोंगराळ भूभाग. समुद्र किनारपट्टीवर लागून असल्याने इथले अनेकजण मासेमारीवर निर्भर आहेत, तर काहीजण इथल्या जंगलांमध्ये मिळणाऱ्या विविध उत्पादनांवर अवलंबून आहेत.

प्रामुख्याने शेती आणि शेतीपूरक व्यवसाय हा इथला अर्थार्जनाचा मुख्य स्रोत आहे. त्यामुळे उत्पन्नाचा विचार केला तर इथल्या बहुतांश नागरिकांचे उत्पन्न हे अल्प उत्पन्न गटातीलच आहे. तुटपुंज्या उत्पन्नावर इथल्या लोकांची गुजराण चालते. त्यामुळे माणसाचा मूलभूत हक्क असणारे घर आणि निवारा इथल्या अनेकांच्या वाट्याला नाही.

सरकारी योजनांचा लाभ काहींना मिळाला आहे. मात्र असे अनेकजण आहेत, ज्यांना या योजना लागूच होत नाहीत. हे लोक गेल्या अनेक वर्षांपासून इथे पडणाऱ्या धो धो पावसाला आणि रोजच उगवणाऱ्या सूर्याला थेट घरात आसरा देतात. पण हे जीवघेणे जिणे किती दिवस जगावे, याचा अंदाज यातल्या अनेकांना नव्हता.

हे ओळखून काणकोण येथील श्री बलराम चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने श्रम धाम योजना साकारली सभापती रमेश तवडकर यांनी. काणकोण परिसरात ज्यांना हक्काचे घर नाही किंवा जे आहे ते डबघाईस आले आणि त्याची दुरुस्ती करणे शक्य नाही, अशांना शोधून पक्के घर बांधून देण्याचे ध्येय त्यांनी बागळले असून ते सत्यातही उतरविले आहे.

दोघांनी आधीच केला गृहप्रवेश

श्रम-धाम योजनेतून बांधलेल्या २० घरांपैकी दोघा स्थानिकांनी आज, १४ रोजीच गृहप्रवेश केला. कारण या घरांना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला उद्या, १५ रोजी संध्याकाळी घरांच्या हस्तांतरणापूर्वी भेट देऊन या घरांची पाहणी करणार आहेत. यावेळी गरजूंच्या जीवनपटावर आधारित पुस्तकाचे अनावरण होईल, असे सभापती तवडकर यांनी सांगितले.

आज मिळणार हक्काच्या घराची चावी

श्रम धाम योजनेतील २० लाभार्थींना आज त्यांच्या हक्काच्या घराच्या चाव्या मिळणार आहेत, त्याही लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते. याहून दुसरा आनंद काय असणार, असे सभापती रमेश तवडकर म्हणाले.

काय आहे श्रम धाम योजनेचे स्वरूप?

नागरिकांच्या लोकसहभागातून श्रम धाम ही योजना राबवण्यात येते. '' एक दिवस श्रम आणि एक रुपया'' अशी या योजनेची रचना आहे. त्यानुसार लोकांच्या श्रमदानातून श्रम धाम योजनेतून २० घरे उभारली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT