David Lobo Death Case Dainik Gomantak
गोवा

आजी स्वर्ग काय असतो? मृत्यू होण्यापूर्वी दोन वर्षांच्या डेव्हिड लोबोने विचारला होता शेवटचा प्रश्न!

डेव्हिडला दिलेल्या लसीमुळे त्याचा जीव गेला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

दैनिक गोमन्तक

David Lobo Death Case

आजी स्वर्ग काय असतो? असे बोबडे बोल बोलणाऱ्या गोव्यातील 23 महिन्यांच्या डेव्हिडने अचानकच एके दिवशी अखेरचा श्वास घेतला. घरभर बागडणाऱ्या, मजा-मस्ती, धमाल करणाऱ्या या चिमुकल्याचं असा अंत होऊ शकतो यावर कोणाचाच विश्वास बसला नव्हता.

ही घटना आहे 20 डिसेंबर 2023 ची. डेव्हिड आपल्या बाबांसोबत पणजी आरोग्य केंद्रात जाऊन येलो फीव्हर लस (Yellow Fever Vaccine) घेऊन आला होता. केनियामध्ये त्यांच्या नातेवाईकांचा एक कौटुंबिक लग्नसोहळा असल्यामुळे घरातील सर्वजण तयारीत होते.

सामान्यता या वयाच्या मुलांना जेव्हा कोणतीही लस दिली जाते तेव्हा पुढील दोन दिवस त्यांची काळजी घेण्याची गरज असते. कारण त्यानंतर मुलांना कणकण येण्याची शक्यता असते. त्यामुळे डेव्हिडची आई लॅरीसा त्याची देखभाल करत होती.

मात्र डेव्हिड अगदी ठणठणीत दिसत होता. घरभर आजीने शिकवलेली गीते (Church songs) म्हणत बागडत होता. त्यामुळे त्याला काही त्रास होत आहे, असे कुणालाच वाटले नाही. त्यावेळी ‘आजी, स्वर्ग म्हणजे काय ग?’ असा प्रश्न डेव्हिडने विचारला असल्याचे आई लॅरीसा सांगते.

दुसऱ्या दिवशी पहाटे साडेतीन वाजता डेव्हिडला अचानक उलट्या सुरू झाल्या. थोड्यावेळाने तो झोपी गेला. मात्र पुन्हा साडेआठ वाजता डेव्हिड अस्वस्थ झाला आणि उलट्या करू लागला. त्यानंतर त्याच्या आईने कौटुंबिक मित्र असलेल्या एका डॉक्टरची भेट घेतली आणि डेव्हिडची तपासणी केली. डॉक्टरने त्याला त्वरित दवाखान्यात हलवण्याचा सल्ला दिला.

त्यानंतर त्यांनी डेव्हिडला उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या दरम्यान बऱ्यापैकी डेव्हिड शांत होता. आपत्कालीन स्थिती असल्याची जाणीव करून देऊनही डॉक्टरने ही गोष्ट गांभीर्याने न घेतल्यामुळे यामध्ये 45 मिनिटे वाया गेली. आई लॅरीसाने त्याची त्वरित चेकअप करण्याची मागणी केली.

मात्र डेव्हिड आपल्या बॉटलने शांतपणे पाणी पित बसला असल्याने ही काही आपत्कालीन स्थिती नसल्याचे डॉक्टरला वाटले आणि आधी केस पेपर करण्यास सांगितले. त्यानंतर त्याला बालरोग ओपीडीमध्ये तपासणीसाठी नेले असता त्याला 104 ताप असल्याचे समोर आले. ताप आहे की नाही हे बघण्यासाठी वापरला जाणाऱ्या थर्मोमीटर जेव्हा डेव्हिडच्या काखेत ठेवण्यात आला, तेव्हा थर्मोमीटरचा तो थंडपणा त्याला सहन झाला नाही आणि त्याने रडायला सुरुवात केली.

त्याचे हे शेवटचे रडणे त्याच्या आईने ऐकले आणि त्यानंतर डेव्हिडने अखेरचा श्वास घेतला. धडधाकट, हसत-खेळत असणाऱ्या डेव्हिडने आकस्मितपणे सर्वांचा निरोप घेण्यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. यामध्ये नेमकी चूक कुणाची याचे उत्तर त्याच्या कुटुंबीयांना आजतागायत सापडले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT