CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Tourism Sector Job : राज्यातील पर्यटन क्षेत्रात २ लाख नोकऱ्या : मुख्यमंत्री सावंत

Cm Pramod Sawant : उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, प्रत्येक विद्यार्थ्यांचे करिअर चांगले घडावे, यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते.

राज्यातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घ्यावी. पुढील पाच वर्षात राज्यात पर्यटन क्षेत्रात २ लाख नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

ते राज्यातील उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी स्वयंपूर्ण गोवा अंतर्गत आयोजित करिअर मार्गदर्शन वेबिनारमध्ये बोलत होते. उच्च शिक्षण संचालनालयाचे डॉ. महादेव गावस, अनुसूचित कल्याण संचालनालयाचे अधिकारी अभिजित जांभळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

डॉ. सावंत पुढे म्हणाले, गोव्यात आता शिक्षण तसेच रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. राज्यातील तरुणाईला व्हाईट कॉलर नोकऱ्या मिळाव्यात, यासाठी सरकारही प्रयत्नात आहे. विद्यार्थ्यांसाठी केंद्र तसेच राज्य सरकारच्या विविध योजना असून मनोहर पर्रीकर स्कॉलर योजनेंतर्गत देशात तसेच परदेशात शिक्षण घेण्यासाठी राज्य सरकारद्वारे लाखोंचे व्याजमुक्त कर्ज दिले जाते.

त्यामुळे गोव्यात पालकांकडे पैसे नाहीत, म्हणून एकही विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाही, नोकऱ्यांसोबत जर तरुणाई पारंपरिक किंवा इतर उद्योग सुरू करणार असेल तर त्यासाठी सरकार साहाय्य करण्यासाठी तत्पर आहे.

राज्यातील काही कंपन्या बारावी सायन्सनंतर बीएससी फार्मा अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना दर महिन्याला विद्यावेतन देतात परंतु अशा अभ्यासक्रमांची विद्यार्थ्यांना माहिती नाही. केवळ २० टक्के विद्यार्थी या अभ्यासक्रमात प्रवेश घेतात.

आपले करिअर निवडताना आपल्याला कोणते काम करायला आवडते. आपले मन कशात अधिक रमते. आपण जो अभ्यासक्रम निवडणार आहोत, त्याबाबत भविष्यात कोणत्या संधी आहेत. या सर्व बाबींचा विचार करून आपल्या पालक शिक्षकांचे मार्गदर्शन घेत निर्णय घेणे गरजेचे असल्याचे डॉ. महादेव गावस यांनी सांगितले.

संयोजन प्रा. सुभाष जाण यांनी केले तर आभार मनोज सावईकर यांनी मानले.

योजनांचा लाभ घ्या!

विद्यार्थ्यांसाठी राज्य तसेच केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. राज्य सरकार, उच्च शिक्षण संचालनालय, समाज कल्याण संचालनालय, अनुसूचित जमाती कल्याण, अनुसूचित जाती या खात्यांद्वारे विविध योजना राबविल्या जातात. त्या योजनांचा आपल्या शिक्षणासाठी लाभ करून घ्यावा, असे आवाहन अभिजित जांभळे यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Labh Drishti Yog 2026: तिजोरी हाऊसफुल्ल होणार, व्यापाऱ्यांना बंपर फायदा! शनी-मंगळाचा 'लाभ दृष्टी योग' बदलणार 4 राशींचे नशीब; सर्व अडचणींचा द एंड

Road Accident: लग्नाचा आनंद ठरला शेवटचा! दोन ट्रकांच्या भीषण धडकेत चिरडली पिकअप; 13 जणांचा मृत्यू, 5 गंभीर जखमी VIDEO

8th Pay Commission Latest Update: पगारवाढच नाही, तर बोनस आणि ग्रॅच्युइटीमध्येही होणार मोठा फेरबदल! 8व्या वेतन आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात

Report: 2027 चा वर्ल्ड कपच नाही, तर 2028 च्या ऑलिम्पिकमध्येही गौतम गंभीरच असणार टीम इंडियाचा 'बॉस'! बीसीसीआय देणार मुदतवाढ?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गोवा दौरा, बाणावलीत प्रसिद्ध मच्छीमार पेले यांच्याशी साधला संवाद; मच्छीमारांच्या अडचणी घेतल्या जाणून

SCROLL FOR NEXT