Myanmar Military Airstrike: म्यानमारमध्ये लष्कराचा बौद्ध मठावर भीषण हवाई हल्ला! 14 जणांचा मृत्यू; 20 गंभीर जखमी

Myanmar Military Airstrike Buddhist Monastery: म्यानमारमधील लष्करी राजवटीचा नागरिक आणि विरोधकांवरील अत्याचार अधिकच हिंसक बनला असून सैन्याने शुक्रवारी मध्य सगाइंग प्रदेशातील एका बौद्ध मठाला लक्ष्य करत विनाशकारी हवाई हल्ला केला.
Myanmar Military Airstrike Buddhist Monastery
Myanmar Military AirstrikeDainik Gomantak
Published on
Updated on

Myanmar Military Airstrike Buddhist Monastery: म्यानमारमधील लष्करी राजवटीचा नागरिक आणि विरोधकांवरील अत्याचार अधिकच हिंसक बनला असून सैन्याने शुक्रवारी मध्य सगाइंग प्रदेशातील एका बौद्ध मठाला लक्ष्य करत विनाशकारी हवाई हल्ला केला. एका आठवड्याभरापासून सुरु असलेल्या मेडिटेशन कॅम्पवर हा हल्ला करण्यात आला. या दुर्दैवी घटनेत 3 महिलांसह तब्बल 14 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 20 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेमुळे युद्धग्रस्त म्यानमारमध्ये नागरी वस्त्या आणि प्रार्थनास्थळांवर होणाऱ्या हवाई हल्ल्यांविषयी आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता अधिकच गडद झाली आहे. हा भीषण हल्ला म्यानमारचे दुसरे सर्वात मोठे शहर असलेल्या मांडलेपासून पश्चिमेला सुमारे 75 किलोमीटर अंतरावर असलेल्या म्याउंग टाऊनशिपमधील 'स्वेल ले ओह' या शांत गावातील मठावर झाला. स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी सकाळी 9च्या सुमारास एका जेट फायटर विमानाने अचानक मठाच्या आवारात बॉम्बचा वर्षाव केला.

Myanmar Military Airstrike Buddhist Monastery
Myanmar Crisis: मरायचं नाही बाबा! म्यानमारमधून लोक करतायेत पलायन; व्हिसासाठी लांबच लांब रांगा?

म्याउंग टाऊनशिपच्या 'सिव्हिल डिफेन्स अँड सिक्युरिटी ऑर्गनायझेशन'चे प्रवक्ते न्वे ऊ यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. शांतता आणि ध्यानधारणेसाठी जमलेले शेकडो लोक क्षणात या जीवघेण्या हल्ल्याचे बळी ठरले, ज्यामुळे संपूर्ण परिसरात रक्ताचा सडा पडला आणि किंकाळ्यांचा आक्रोश पसरला.

Myanmar Military Airstrike Buddhist Monastery
Myanmar Soldiers: 42 म्यानमार सैनिकांनी मिझोरामच्या पोलिस ठाण्यात घेतला आश्रय; बंडखोरांचा छावणीवर कब्जा

म्यानमारमध्ये (Myanmar) लोकशाही समर्थक सशस्त्र गट, वांशिक बंडखोर संघटना आणि लष्करी सैन्यात गेल्या अनेक महिन्यांपासून हिंसक संघर्ष सुरु आहे. सत्ताधारी लष्कर विरोधकांना चिरडण्यासाठी नागरी वस्त्या आणि धार्मिक स्थळांवर सर्रास हवाई ताकदीचा वापर करत असल्याचे समोर आले. सगाइंग हा भाग लष्करी राजवटीला विरोध करणाऱ्यांचा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे सैन्याकडून या भागाला सातत्याने लक्ष्य केले जात आहे. एका पवित्र बौद्ध मठावर अशा प्रकारे बॉम्बहल्ला करुन निरपराध नागरिकांचे बळी घेतल्याने जगभरातून म्यानमार लष्कराच्या या कृत्याचा तीव्र निषेध केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com