Accident in Goa
Accident in Goa Dainik Gomantak
गोवा

Accident in Goa: गोव्यातील अपघातसत्र थांबेना! स्वयं अपघातात दोघेजण जखमी

दैनिक गोमन्तक

Goa Road Accident: गोव्यातील वाढते अपघात आता सरकारची डोकेदुखी बनले आहे. दररोज किमान 1-2 अपघातांच्या बातम्या गोवेकरांच्या वाचण्यात आणि बघण्यात येतात. गोव्यात शिरवई येथे एक स्वयं अपघात घडला आहे. यामध्ये दोघेजण जखमीही झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरवई येथे एका कारचा स्वयं अपघात घडला. कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार विद्युत पोलवर जाऊन आदळली. या धडकेत गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

यावेळी गाडीत तिघेजण उपस्थित होते. त्यापैकी दोघांना या अपघातात जबर मार लागला असून त्यांना केपेमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, ताळगावमध्ये रविवारी रात्री दुचाकी आणि कारमध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला होता. ही धडक इतकी भीषण होती की यात दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने इस्पितळात नेत असताना त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघातातील कारचालक महिलेला सायंकाळी पणजी पोलिसांनी अटक केली आहे. बेदरकारपणे व निष्काळजीपणे कार चालवल्याप्रकरणी या महिलेला अटक करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi Goa Meeting : लुटारू काँग्रेसचे स्वप्न अपूर्ण ठेवा! पंतप्रधान नरेंद्र मोदी

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आईसाठी 7 वर्षांची मुलगी ठरली 'देवदूत'; सतर्कता दाखवत वाचवला जीव

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT