accident in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Accident : गोव्यात वऱ्हाड्यांच्या बसगाड्यांचा अपघात; बस पलटी झाल्याने अनेकजण जखमी

मडगावमधून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या गाडीला झालेल्या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत, तर म्हापशात वऱ्हाड्यांना सोडल्यानंतर बस पलटी झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Accident : गोव्यात सध्या लग्नसराईची लगबग सुरु झाली आहे. अनेकठिकाणी लग्नसमारंभ आयोजित केले जात असतानाच आज सोमवारी दोन विचित्र अपघात पाहायला मिळाले. या दोन्ही घटनांमध्ये लग्नाच्या वऱ्हाडी मंडळींच्या बसगाड्या अपघातग्रस्त झाल्या आहेत. मडगावमधून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या गाडीला झालेल्या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत, तर म्हापशात वऱ्हाड्यांना सोडल्यानंतर बस पलटी झाली.

मडगावहून एक मिनीबस वऱ्हाड्यांना सोडण्यासाठी कर्नाटकमध्ये जात होती. कर्नाटकमधील बेलुरुच्या दिशेने जात असताना चोर्ला घाट परिसरात ओलमणी गावाजवळ पहाटेच्या सुमारास बस पलटी झाले. या बसमध्ये सुमारे 35 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे. ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी बहुतेक प्रवासी झोपले होते. त्यामुळे अचानक झालेल्या अपघातामुळे जवळपास सर्वांनाच इजा झाली. या अपघातात बसचं मोठं नुकसान झालं असून 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. उर्वरित प्रवाशांना किरकोळ इजा झाली असून गंभीर जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डुलकी लागल्यामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दुसरीकडे म्हापशातही लग्नाच्या बसला अपघात झाला आहे. म्हापशातील घाटेश्वर खोर्ली परिसरात हा लग्नसमारंभ आयोजित करण्यात आला होता. लग्नासाठी आलेल्या लोकांना सोडल्यानंतर रिव्हर्स घेत असताना बस रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात कोसळली. सुदैवाने बसमधील सर्वजण आधीच उतरल्यामुळे चालक वळगता कुणालाही दुखापत झाली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi UAE Visit 2026: "होर्मुजची कोंडी फुटणे ही आमची प्राथमिकता'' पीएम मोदींचा युएईच्या भूमीवरुन जगाला शांततेचा संदेश

Viral Video: "मीच खरा मोगली" म्हणत पठ्ठ्याचा सापाशी पंगा, डंक मारताच हुसेन बोल्टसारखा सुस्साट; नेटकरी म्हणाले, 'एका झटक्यातच जिरली'

उघड्यावर कचरा टाकल्यास 5 हजारांचा दंड, नास्नोळा पंचायत मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; जागरूक नागरिकांना 10 हजारांचे बक्षीस

Ketu Gochar 2026: केतुने बदलली चाल अन् 3 राशींच्या नशीबाने घेतला 'यू-टर्न'! ऑफिसमधील कामाचे क्रेडिट चमच्यांना मिळणार; करिअरची गाडीही पंक्चर होणार

Usgao Water Issue: उसगावात दूषित पाणीपुरवठा, दोन दिवसांत उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT