188 students visit Aguada Fort Jail Dainik GOmantak
गोवा

Aguada Jail: क्रांतिकारकांना नमन! 188 विद्यार्थ्यांची आग्वाद तुरुंगाला भेट; ऐतिहासिक कोठड्यांचा घेतला अनुभव

Aguada Fort Jail Visit: संकुलातील ‘कोअर ब्लॉक’मध्ये कोरलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या नावांकडे त्यांनी शांततेने पाहिले. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करत ही भेट विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणेची शाळाच ठरली.

Sameer Panditrao

पणजी: क्रांतिदिनाच्या निमित्ताने गोमंतकीय स्वातंत्र्य संग्रामात बलिदान देणाऱ्या वीरांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील १८८ विद्यार्थी, शिक्षक, मार्गदर्शक व पालकांनी शिकेरीमधील ऐतिहासिक आग्वाद पोर्ट आणि तुरुंग संकुलाला भेट दिली.

यावेळी विद्यार्थ्यांनी गोव्याच्या इतिहासाचे सजीव दर्शन घेतले आणि स्वातंत्र्य लढ्यातील शौर्य, त्याग आणि संघर्षाची जाणीव त्यांच्या मनात कोरली गेली, असे मत शिक्षकांनी यावेळी व्यक्त केले.

अनेक गोमंतकीय स्वातंत्र्यसैनिकांना पोर्तुगीज सत्ताकाळात कैद करण्यात आलेल्या त्या ऐतिहासिक तुरुंग कोठड्यांचा अनुभव अखेर विद्यार्थ्यांनी घेतला. संकुलातील ‘कोअर ब्लॉक’मध्ये कोरलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या नावांकडे त्यांनी शांततेने आणि कृतज्ञतेने पाहिले. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करत ही भेट विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षणाची, जाणिवेची आणि प्रेरणेची शाळाच ठरली.

विविध विद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

या विशेष भेटीत डॉ. के. बी. हेडगेवार हायस्कूल, बांबोळी येथून ४३ विद्यार्थी व २ शिक्षक, हेडगेवार प्राथमिक व माध्यमिक शाळा, अस्नोडा येथून १२२ विद्यार्थी व १० शिक्षक, तसेच विद्या प्रबोधिनी प्राथमिक शाळा, पर्वरी येथून २३ विद्यार्थी, १ मार्गदर्शक आणि १० शिक्षक व पालक सहभागी झाले होते. १८ जून, गोवा क्रांती दिनानिमित्त गोमंतकीय नागरिकांसाठी आग्वाद संकुलात मोफत प्रवेश उपलब्ध करून देण्यात आला होता, जेणेकरून सामान्य लोकही स्वातंत्र्यलढ्यातील वीरांना आदरांजली अर्पण करू शकतील. यामुळे विद्यार्थ्यांप्रमाणेच अनेक नागरिकांनीही या ऐतिहासिक स्थळाला भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली.

आग्वाद इंटरॅक्टिव्ह म्युझियम भेट

आग्वाद इंटरॅक्टिव्ह म्युझियम या अत्याधुनिक संग्रहालयात टच स्क्रीन, माहिती फलक, ऑडिओ-व्हिज्युअल प्रेझेंटेशनद्वारे विद्यार्थ्यांनी गोव्याचा समृद्ध इतिहास व स्वातंत्र्य संग्रामाचे टप्पे अनुभवले. सजीव सादरीकरणाच्या माध्यमातून इतिहासाची आंतरिक मांडणी विद्यार्थ्यांना समजण्यास याच म्युझियममुळे मदत झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT