Goa Self Accident  Dainik Gomantak
गोवा

Ambeli Accident: गाडी चालवता येत नसताना केले धाडस, ताबा सुटून कोसळला खाली! बंगालच्या तरुणाचा आंबेलीत अपघाती मृत्यू

Cutbona Ambeli accident: मोहम्मद हा मूळ पश्चिम बंगालमधील मालडा जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो कुटबण येथे कामाला होता, अशी माहिती कुंकळ्ळी पोलिसांनी दिली.

Sameer Panditrao

मडगाव: दुचाकी चालविता येत नसतानाही ती चालविण्याचे धाडस एका १८ वर्षीय युवकाच्या जीवावर बेतले. मोहम्मद फझलू असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव असून, शनिवारी (ता.२४) कुटबण-आंबेली येथे स्वयंअपघातात त्याचा मृत्यू झाला.

मोहम्मद हा मूळ पश्चिम बंगालमधील मालडा जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो कुटबण येथे कामाला होता, अशी माहिती कुंकळ्ळी पोलिसांनी दिली. अपघातानंतर पोलिसांनी फझलू याच्या भावाकडे चौकशी केली असता, त्याला दुचाकी चालविता येत नव्हती, असे उघड झाले.

घरामध्ये या दुचाकीची चावी ठेवली होती. कुणी बघत नसल्याचे पाहून मोहम्मदने ती चावी घेऊन दुचाकी सुरू करून, तो चालवू लागला असता, घरापासून शंभर मीटर दूर अंतरावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने तो खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर इजा पोचली. उपचारासाठी त्याला बाळ्ळी येथील आरोग्य केंद्रात नेले असता, त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

अपघाती मृत्यू म्हणून कुंकळ्ळी पोलिसांनी हे प्रकरण नोंदविले आहे. पोलिस उपनिरीक्षक आदित्य सावंत पुढील तपास करीत आहेत. मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे.

केरी - फोंडा येथे एकाचा अंत

दुकान बंद करून घरी जाताना केरी - फोंडा येथील दुचाकीस्वार कृष्णा जानू जल्मी (वय ५८ वर्षे) यांचा स्वयंअपघातात मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (ता. २४) झाला. त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल केले; परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी पंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT