Accident At Verna IDC Dainik Gomantak
गोवा

Verna Accident: नियंत्रण सुटले अन् कार दरीत कोसळली, वेर्णा येथे 18 वर्षीय युवकाचा मृत्यू

Verna Fatal Accident: पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास तो कारने येत असताना हा अपघात झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

वेर्णा औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यावरून पहाटे भरधाव वेगात जात असताना कारवरील नियंत्रण गेल्याने कार बाजूच्या दरीत पडून ज्युलियस फर्नांडिस या १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.

हा युवक देवटी-लोटली येथील असून पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास तो कारने येत असताना या रस्त्यावर त्याचा वाहनावरील ताबा गेला आणि हा अपघात घडला, अशी माहिती वेर्णा पोलिसांनी दिली.

या अपघात स्थळाजवळ एक कारखाना असून या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी बोलावले.

घोगळ-बोलशेत 'थार' उलटली

घोगळ - मडगाव येथील बोलशे सर्कलजवळ आज एका चालकाचे गाडीवरील नियंत्रण गेल्याने थार जीप उलटली. सुदैवाने जीपचालकाला इजा झाली नाही.

दुसऱ्या घटनेत, १८ जुलै रोजी सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास आपल्या कारची फातर्पा येथे एका मोटारसायकलला धडक देऊन आनंद वेळीप (३१) आणि प्रशांत गावकर (३८) या दोघांना जखमी केल्याच्या आरोपाखाली कुंकळ्ळी पोलिसांनी कारचालक मिदानसाब नदाफ याला शुक्रवारी सायंकाळी अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Robotic Surgery: कमी वेदना, जलद रिकव्हरी! रोबोटिक सर्जरी म्हणजे काय? नॉर्मल ऑपरेशनपेक्षा किती वेगळी? जाणून घ्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून

Oracle Layoffs 2026: सकाळी 6 वाजता मेल आला अन् नोकरी गेली! ओरॅकलने पुन्हा दिला कर्मचाऱ्यांना नारळ; टेक कंपन्यांमध्ये चाललंय तरी काय?

Viral Video: ना धड इंग्रजी बोलता येईना, ना वाचता येईना! पाकिस्तानी आमदाराचा व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

Pakistani Cosmetic Creams: तुम्हीही गोरेपणासाठी 'ही' क्रीम वापरताय का? 2 पाकिस्तानी सौंदर्य उत्पादनांवर मोठी कारवाई; भारतीय ग्राहकांची होतेय फसवणूक

"माझी पत्नीही ओरडायला लागली..."; वैभव सूर्यवंशीला संघातून बाहेर, दिग्गज खेळाडूचा टीम इंडियाच्या मॅनेजमेंटवर पारा चढला...

SCROLL FOR NEXT