Wall Collapsed In Margao, Goa Dainik Gomantak
गोवा

Margao Goa: बापलेक झोपेत असताना काळाचा घाला, छत कोसळून युपीच्या 18 वर्षीय मजुराचा मृत्यू

Wall Collapsed In Margao: कोमुनिदादच्या जागेवर घर उभारण्यात आलेल्या घरात कार्तिक आणि दिग्विजय चौहान भाड्याने राहत होते.

Pramod Yadav

गोव्यात गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून, पडझडीच्या अनेक घटना घडत आहेत. फातोर्डा येथील ताळसाण झर घराची भिंत आणि छत कोसळून 18 वर्षीय मजुराचा मृत्यू झाला, तर त्याच्या वडील जखमी झाले आहेत. बुधवारी (१७ जुलै) सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.

कार्तिक चौहान (18, रा. ताळसाण झर, फातोर्डा मूळ उत्तर प्रदेश) असे या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तर, दिग्विजय चौहान असे जखमी झालेल्या त्याच्या वडिलांचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फातोर्डा येथील ताळसाण झर येथील कोमुनिदादच्या जागेवर घर उभारण्यात आले आहे. या घरात कार्तिक आणि दिग्विजय चौहान भाड्याने राहत होते. दरम्यान, सकाळी साडेसहा वाजता घराच्या मागील भिंत कोसळली आणि त्यामुळे घराचे छत देखील खाली आले.

पत्राचे छत खाली आल्याने घरात झोपलेल्या बापलेकाच्या अंगावर ते कोसळले. यात कार्तिक आणि दिग्विजय जखमी झाले. कार्तिक गंभीर जखमी झाल्याने रक्तस्त्राव सुरु झाला. यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

तर, दिग्विजय यांच्या पायाला जखम झाली आहे. घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदकार्य केले. दरम्यान, मृत कार्तिकचा मृतदेह दक्षिण जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT