Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: रस्‍तेअपघातांत प्रत्‍येक तासाला जातोय 18 जणांचा बळी

Goa Accident: मुख्याधिकारी सचिन देसाई : डिचोलीत जागृती रॅली; देशातील अपघातांचे प्रमाण चिंताजनक

दैनिक गोमन्तक

Goa Accident: देशात रस्तेअपघातांत मृत्यू होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. दर तासाला किमान 18 व्यक्ती अपघातांचे बळी ठरतात. त्‍यामुळे प्रत्‍येकाने वाहन चालवताना काळजी घ्‍यावी, असे आवाहन डिचोलीचे मुख्याधिकारी सचिन देसाई यांनी केले. अपघात नियंत्रणात आणण्यासाठी युवा पिढीने पुढाकार घ्यावा, असेही ते म्‍हणाले.

डिचोली पालिका आणि वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्‍यावेळी देसाई बोलत होते. पालिका इमारतीजवळ नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्या उपस्थितीत देसाई यांनी बावटा दाखविल्यानंतर रॅलीला प्रारंभ झाला. यावेळी नगरसेवक विजयकुमार नाटेकर, ॲड. रंजना वायंगणकर यांच्यासह वाहतूक पोलिस, आयटीआयचे प्रशिक्षक, पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

‘‘वाहतूक नियमांचे पालन करा अन् रस्ता अपघात टाळा. मद्यप्राशन करून वाहने चालवू नका’’ असा संदेश देत येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या (आयटीआय) प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी आज बुधवारी शहरात ही जागृती रॅली काढली. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर रॅलीची सांगता झाली. समारोप सोहळ्यात मान्यवरांनी मार्गदर्शन केले. बाराव्या रस्तासुरक्षा सप्ताहानिमित्त ही रॅली काढण्‍यात आली.

सप्टेंबर महिन्‍यात 16 जणांचा मृत्यू

1 गोव्यात सप्टेंबर महिन्यात रस्तेअपघातांत १६ जणांचा मृत्यू झाला. त्यातील ५० टक्के दुचाकीस्वार आहेत. एकूण मृत्यूंपैकी दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

2 दुचाकीस्वारांत ७ चालक व १ सहचालक आहे. या महिन्यात एकूण २२७ अपघात नोंद झाले. त्यापैकी १४ प्राणघातक होते.

3 त्यातील ६ उत्तरेतील तर ८ दक्षिणेतील होते. ११ गंभीर अपघात झाले. त्यातील ८ उत्तरेतील व ३ दक्षिणेत नोंद झाली आहे.

4 किरकोळ अपघात ४७ झाले. त्यात उत्तरेतील १७ व दक्षिणेतील ३० होते. या महिन्यात वाहतूक खात्याने ३,६५४ चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली.

मद्यप्राशन करून वाहन चालवू नका

वाहतूक पोलिस विभागाचे साहाय्‍यक उपनिरीक्षक गोपाळ केरकर यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी वाहतूक नियमांविषयी उपयुक्त माहिती दिली. वाहन चालविण्यापूर्वी प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करावे, दुचाकी चालवताना हेल्मेट परिधान करावे, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असे आवाहन त्यांनी केले. ॲड. रंजना वायंगणकर आणि विजयकुमार नाटेकर यांनीही मार्गदर्शन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT