Mormugao constituencies Dainik Gomantak
गोवा

मुरगाव तालुक्यातील चार मतदारसंघातून फेटाळले 18 अर्ज

उमेदवारांची अंतिम यादी सोमवार नंतर स्पष्ट होणार

दैनिक गोमन्तक

विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) भरण्यात आलेल्या नामांकन अर्जाची छाननी प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून पार पाडण्यात आली. मुरगाव तालुक्यातून चारही मतदारसंघातून भरण्यात आलेल्या 57 अर्जांपैकी 39 अर्ज ग्राहय ठरले आहेत. तर 18 अर्ज फेटाळण्यात आले आहेत. उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.

काँग्रेस, भाजप, (BJP) आम आदमी पक्ष, मगो, तृणमूल काँग्रेस, (TMC) गोवा फॉरवर्ड यांच्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले असून अपेक्षित अशा लढती जवळपास निश्चित आहे. उमेदवारांनी खबरदारी म्हणून एकापेक्षा जास्त अर्ज भरले होते, तसेच काही डमी अर्जही भरण्यात आले होते. यातील काही अर्ज फेटाळण्यात आले आहे, तर काही ग्राह्य ठरले आहेत. त्यामुळे एकूण उमेदवारांची अंतिम यादी सोमवार नंतर स्पष्ट होणार आहे.

दरम्यान मुरगाव (Mormugao) तालुक्यातील चारही मतदार संघातील कुठ्ठाळी मतदार संघात एकूण 19 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. पैकी 7 अर्ज फेटाळण्यात आले. तर 12 अर्ज ग्राह्य धरण्यात आले. यात नारायण नाईक (भाजपा), गिल्बर्ट मरियानो रॉड्रिगीस (तृणमूल काँग्रेस), एलिना साल्ढाणा ( आप ), भक्ती खडपकर (शिवसेना), तेवेतोनियो कॉस्ता (रीव्होल्यूशनरी गोवन्स पार्टी), आंतोनिओ वाझ (अपक्ष), फातिमा फुर्तादो (अपक्ष), गिरीश पिल्ले (अपक्ष) मेर्मियाना वाझ (अपक्ष), शरण मेट्टी (अपक्ष), विशाल नाईक (अपक्ष) आधी अर्ज ग्राह्य धरण्यात आले.

दाबोळी मतदार संघातून एकूण 9 अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यात एक अर्ज फेटाळण्यात आला तर 8 अर्ज ग्राह्य धरण्यात आले. यात माविन गुदिन्हो (भाजपा), कॅप्टन विरीयातो फर्नांडिस (काँग्रेस), फिलीप डिसोझा (राष्ट्रवादी काँग्रेस), महेश भंडारी (तृणमूल काँग्रेस), गजानन बोरकर ( रिव्होल्युशनरी गोवन्स), प्रेमानंद नानोस्कर (आप), तारा केरकर (आप) व संजिता पेरनिम( अपक्ष) आदी अर्ज ग्राह्य धरण्यात आले.

मुरगाव मतदार संघातून एकूण 14 अर्ज दाखल करण्यात आले होते. यात 5 अर्ज फेटाळण्यात आले तर 9 अर्ज ग्राह्य धरण्यात आले. यात जयेश शेटगावकर (तृणमूल काँग्रेस), मिलिंद नाईक (भाजपा), संकल्प आमोणकर (काँग्रेस) शेख अकबर (राष्ट्रवादी काँग्रेस), परशुराम सोनुर्लेकर (आप), परेश तोरस्कर ( रिव्होल्यूशनरी गोवन पार्टी), इनायतूला खान (अपक्ष), गोपाळ कांबळी (अपक्ष), निलेश नावेलकर (अपक्ष).

वास्को मतदारसंघातून एकूण 13 अर्ज दाखल करण्यात आले होते. पैकी 3 अर्ज फेटाळण्यात आले. तर 10 अर्ज ग्राह्य धरण्यात आले. यात कृष्णा साळकर (भाजपा), कार्लुस आल्मेदा (काँग्रेस), सैफुल्ला खान (तृणमूल काँग्रेस ), आंद्रे विएगस रिव्होल्यूशनरी गोवन्स) मारुती शिरगावकर [शिवसेना) सुनील लोरान (आप), संदीप शेट्ये (जय महाभारत पार्टी), अँड्र्यू डिकुन्हा (अपक्ष), चंद्रशेखर वस्त (अपक्ष), लोरेटा श्रीधरन (अपक्ष).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT