Pali Waterfall, Sattari  Dainik Gomantak
गोवा

Goa Pali Waterfall: धबधब्यावर अडकले तब्बल १७० जण आणि त्यानंतर....

Sattari News: नदीपात्रातील पाणी अचानक वाढले आणि धबधब्यावर गेलेल्या युवकांचे धाबे दणाणले

गोमन्तक डिजिटल टीम

आपत्कालीन यंत्रणेने मुसळधार पावसाची ‘रेड अलर्ट’ची सूचना देऊनही रविवारी सत्तरी तालुक्यात पाली येथे पावसाळी पर्यटनासाठी आलेले १७० जण नदीचे पाणी अचानक वाढल्याने धबधब्यावरच अडकले. अखेर प्रसंगावधान राखून अग्निशमन दल, म्हादई अभयारण्य विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी मदतकार्य मोहीम राबवून त्यांची सुखरूप सुरक्षितस्थळी नेले.

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी पावसाळ्यात धोकादायक धबधब्यांवर लोकांना जाण्यास बंदी घातली होती. त्यानंतर काहींनी या निर्णयावर आक्षेप घेतल्यानंतर सरकारने सुरक्षित ठिकाणे असलेले धबधब्यांवर जाण्यास परवानगी दिली होती. रविवारी पाली गावातील धबधब्यांवर पावसाळी पर्यटनासाठी राज्याच्या विविध भागांतून लोक आले होते. यात युवक-युवतींची संख्या अधिक होती. मात्र, दुपारी अचानक नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने ते अडकून पडले होते.

वाळपई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी संतोष गावस, फायर फायटर कृष्णा नाईक, सत्यवान गावस, सुधाकर गावकर, अजय घोलकर, अविनाश नार्वेकर, संदीप गावकर, रूपेश गावकर, चालक तुळशीदास झर्मेकर आदींनी पाली गावात जाऊन मदतकार्य केले. म्हादई अभयारण्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक लोकांनीही योगदान दिले.

ॲड. शिवाजी देसाई

हवामान खाते तसेच आपत्कालीन विभागाने रविवारी अतिवृष्टीचा इशारा दिला होता. तरीदेखील अनेकजण धबधब्यांवर गेले. काहीजण पाली-सत्तरी येथील धबधब्यावर अतिवृष्टीमुळे अडकून पडले. आपत्कालीन विभाग तसेच हवामान खात्याच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे योग्य नव्हे.

...अन् पाचावर धारण बसली

आजच्या घटनेत दुपारी येथील नदीपात्रातील पाणी अचानक वाढले आणि धबधब्यावर गेलेल्या युवकांचे धाबे दणाणले. वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांसह वन कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. स्थानिक लोकांनीही मदतीचा हात पुढे केला. सायंकाळी उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Auction 2025: मास्टर ब्लास्टरच्या लेकाला मिळाला खरेदीदार! शेवटच्या क्षणी MI ने खेळला मोठा डाव

Mumbai - Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी अपडेट, मुख्य बोगदा १५ दिवस राहणार बंद

Bhopal Goa Flight: भोपाळ ते गोवा थेट विमानसेवा! पहिल्यांदाच 180 आसनी क्षमतेचे बोईंग प्रवाशांच्या सेवेत

IPL Auction: 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर पडला पैशांचा पाऊस, RR च्या ताफ्यात सामील; संजूच्या नेतृत्वाखाली करणार गर्दा!

धक्कादायक! 'गोवा सोड अन्यथा..', धमकी देत मारहाण करणाऱ्या 'मगो'च्या नेत्याला अटक

SCROLL FOR NEXT