Goa Rain: मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी झाडांची पडझड होऊन रस्ता वाहतुकीस बंद झाला होता
Goa Valpoi RainDainik Gomantak

Valpoi News: वाळपईत पावसाचे थैमान; रस्त्यावरची वाहतूक झाली बंद

Goa Rain: मुसळधार पावसामुळे झाडांची पडझड होऊन रस्ता वाहतुकीस बंद झाला होता
Published on

वाळपई परिसात कालरात्री पासून काही गावात मुसळधार पावसांबरोबर वादळी वारे वाहत होते. त्यामुळे काही ठिकाणी झाडांची पडझड होऊन रस्ता वाहतुकीस बंद झाला होता.

आज सकाळी ७.१५ च्या दरम्यान वाळपईमार्गे जाताना दाबोस सोनाळ रस्त्यावर फणसाची भली मोठी फांदी कोसळून रस्ता वाहतूक सुमारे अर्धा तास बंद होती. एका बाजूंनी कशी बशी वाहने वाट काढीत जात होती.

वाळपई अग्निशमनाला माहिती मिळताच दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन कोसळलेली मोठी फांदी हटवून सव्वाआठ वाजता रस्ता मोकळा झाला.

Goa Rain: मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी झाडांची पडझड होऊन रस्ता वाहतुकीस बंद झाला होता
Valpoi News: बाप रे! गुळेली -मुरमुणे मेळावली मोठा खड्डा; स्थानिकांनी मांडला वेगळाच तर्क

सत्तरी तालुक्यात प्रचंड प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यातच वादळी वारेही काही प्रमाणात वाहत आहेत. रस्त्यालगतची झाडे अशावेळी कोसळत आहेत. वाळपई अग्निशमनचे जवान गंगाराम पावणे, प्रितेश गावकर, चालक तुळशीदास झर्मेकर यांनी दाबोस येथे मदत कार्य केले.

तसेच सायंकाळी चरावणे येथे वीज वाहिन्यांवर आंब्याची फांदी पडून वीज वाहिन्या तुटल्या. त्या ठिकाणीही जवानांनी धाव घेऊन मदत कार्य केले. दुपारी ऊन पडले होते. पुन्हा सायंकाळी चारच्या दरम्यान पावसाची रिमझिम सुरू होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com