JEE Advance Exam Dainik Gomantak
गोवा

JEE Advance 2021: मुष्टीफंड आर्यन विद्यार्थ्यांची उंचभरारी

राज्यातील 17 विद्यार्थ्यांचे JEE Advance परिक्षेत यश

Siddhesh Shirsat

JEE Advance 2021: मुष्टीफंड आर्यनच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरच्या ‘जेईई ॲडव्हान्स्ड 2021’ च्या परिक्षेत उंचभरारी घेतली आहे. राज्यातील 17 विद्यार्थ्यांनी देशभरातून या परिक्षेत यश मिळविल्‍याची माहिती मुष्टीफंड आर्यन उच्च माध्यमिक स्कूलचे (Mushtifuand Aryan Highschool) संचालक व्यंकटेश प्रभुदेसाई यांनी दिली. गोव्यासाठी हा ऐतिहासिक प्रसंग असून 2000 सालनंतर 10 हजार क्रमांकाच्या आत 15 विद्यार्थ्यांनी यश गाठण्याचा हा विक्रम असल्याचे ते म्हणाले.

खूप कष्टाने राज्यातील मुले राष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत, याचा गोमंतकीयांना अभिमान असायला हवा. हर्ष खांडेपारकर याने मिळविलेले यश ही राज्यासाठी अभिमानास्‍पद बाब आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जेईई ॲडव्हान्स्डमध्ये यश मिळविले आहे, त्यांना विविध क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत. त्या संधीचे सोने करण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर असून राज्‍यातील हे तरुण राज्याला देश पातळीवर नावारूपाला आणतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

देशभरातून जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेत 1393व्या क्रमांकावर आलेला हर्ष खांडेपारकर याच्याशी संपर्क साधला असता, त्याने कोविड महामारीच्या काळातील व्यथा मांडतानाच राज्यातील तरुणांनी अथक परिश्रम घेतल्यास काहीही अशक्य नाही. राज्‍यातील विद्यार्थ्यांनी त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली.

यशस्वी विद्यार्थी आणि जेईई परिक्षेतील क्रमांक

1) हर्ष खांडेपारकर- क्र. 1393, 2) अग्रजाह भोबे - क्र. 1457, 3) साईराज घोसरवाडकर - क्र. 1800, 4) स्वतीत वालावलीकर - क्र. 3026, 5) मनाली मांजरेकर - क्र. 3077, 6) रतन दोड्डलिंगन्नावर - क्र. 3901, 7) जोशुआ बार्रेटो - क्र. 4142, 8) रूजुला कामत - क्र. 4196, 9) अखिल नाईक - क्र. 5245, 10) तेजस तेंडुलकर - क्र. 5864, 11) निलय कामत - क्र. 7033, 12) विशाल तारी - क्र. 7178, 13) अभिन्‍न तारी - क्र. 7447, 14) आदित्य भट - क्र. 7961, 15) आर. हरिहरन - क्र. 9476, 16) अमित कुवेलकर - क्र. 13375, 17) आदी नेसरकर - क्र. 17766.

1800मध्ये तिघे

देशभरातून 1800 क्रमांकामध्ये राज्‍यातून तिघांनी, 4200 मध्ये 8 जणांनी तर 10 हजारमध्ये 15 जणांनी यश मिळविले आहे. यंदा कोविड महामारीचे संकट असतांनाही राज्‍यातील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश नेत्रदीपक असल्याचे श्री. प्रभुदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vinorda Theft: दरवाजा तोडला, दागिने-रोकड लंपास; दिवसाढवळ्या घरफोडीमुळे विर्नोड्यात खळबळ

Goa: शेतकऱ्यांसाठी दिलासा! ‘हजारी केळी’ बनली बागायतदारांसाठी ‘ढाल’; खेतींपासून होतोय बचाव

Goa Politics: खरी कुजबुज; भाऊ, किती खड्डे बुजविले?

Tuyem Hospital: ..अन्यथा डिसेंबरमध्ये आंदोलन! तुयेतील हॉस्पिटल लवकर सुरू करण्याची मागणी; 8 वर्षे रखडले लोकार्पण

Ambavali Eco Tourism: आंबावलीत 1.04 लाख चौमी.जमिनीवर ‘इको टुरिझम’ प्रकल्प! IPB ची तत्त्वतः मान्‍यता; सूचना मागवल्या

SCROLL FOR NEXT