Vijai Sardesai alleges on Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Vs Vijai Sardesai: टीसीपी कायद्यावरुन मुख्यमंत्री अन् सरदेसाई यांच्यात जुंपली

आमदार सरदेसाई यांनी 2000 कोटींच्या घोटाळ्याचा केला आरोप

Sumit Tambekar

गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा आमदार विजय सरदेसाई यांनी टीसीपी कायद्यातील ‘16 बी’ दुरुस्तीचा दुरुपयोग केला असल्याचा आरोप केला आहे. याबाबत सरदेसाई म्हणाले की, या दुरुस्तीखाली मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व या खात्याचे तत्कालीन मंत्री बाबू कवळेकर यांनी सुमारे 2000 कोटींचा घोटाळा केलेला आहे. यावर आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सरदेसाईंना कायदेशिर नोटीस देणार असल्याचं म्हटले आहे.

(16b amendment in tcp act Vijai Sardesai alleges on Pramod Sawant)

पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, सरदेसाई यांनी जो आरोप केला आहे, त्याचा त्यांना एकतर खुलासा करावा लागेल नसेल तर कारवाईला सामोरे जावे लागेल. सरदेसाई हे माजी नगर विकासमंत्री होते, यांच्याकडे या खात्याचा पदभार होता. त्यांना माहिती आहे, तरी ही ते मुख्यमंत्र्यांना कसे दोषी ठरवू शकतात असे ही ते म्हणाले.

लोकांचे लक्ष वेधण्यासाठी सरदेसाई यांचा आरोप

लोकांचे लक्ष वेधण्यासाठी सरदेसाई यांनी जाणीवपुर्वकआरोप करणे सुरु केले आहे. त्यामूळे त्यांना कायदेशीर प्रक्रियेला समोरे जावे लागणार आहे. त्यांना हे आरोप सिद्ध करावे लागतील नसेल तर कारावाईला सामोरे जावे लागेल. तसेच त्यांनी जितक्या कोटींचा आरोप केला आहे. तेवढी सविस्तर माहिती द्यावी लागणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

आमदार विजय सरदेसाई आपल्या आरोपावर ठाम

मुख्यमंत्र्यांनी नोटीस पाठवणार असे म्हटल्यानंतर ही आमदार विजय सरदेसाई यांनी आपण केलेल्या आरोपावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तसेच मला अद्याप कोणतीही कायदेशीर नोटीस मिळालेली नाही, मी कोणत्याही नोटीससाठी तयार आहे, याला उत्तरही मिळेल. असे ते म्हणाले आहेत.

सरदेसाई म्हणाले टीसीपी च्या ‘16 बी’ बाबत मी केलेल्या माझ्या आरोपांवर मी ठाम आहे. मी 16 बी आणले आहे. ज्या अंतर्गत फक्त 32 केसेस फायनल झाल्या होत्या, आणि बाबू कवळेकर अंतर्गत जवळपास 5500 केसेस फायनल झाल्या होत्या. दिगंबर कामत आणि आता भाजपमध्ये सामील झालेले इतर काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचे नेतृत्व करत असताना काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यावर हा मुद्दा केवळ मीच मांडला नव्हता. असे ही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT