MLA Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

एक खड्डा दुरुस्तीसाठी 16 हजार तर, लाडूंसाठी 40 लाख खर्च; गोवा सरकारची लूट सुरु असल्याचा सरदेसाईंचा आरोप

Goa Assembly Monsoon Session 2024: प्रोटोकॉल खात्याने व्हिआयपी लोकांच्या वाहतुकीसाठी २०२२ पासून ४.३२ कोटी रुपये खर्च केले.

Pramod Yadav

रस्त्यातील खड्डे बुझवण्यासाठी आणलेल्या गोवा सरकारने जेट पॅचर मशीन आणली. या मशीनच्या माध्यमातून 18,899 खड्डे बुजवण्यासाठी सरकारने 30 कोटी 52 लाख खर्च केले. एका खड्डयासाठी सरकारला सरासरी सोळा हजार रुपये खर्च आला, अशी माहिती गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी सभागृहात दिली.

गोवा विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे असलेल्या गृह, वित्त, बांधकाम याखात्यासंबधित सूचना आणि कपात सत्रात आमदार सरदेसाई बोलत होते.

सार्वजनिक बांधकाम खात्याबाबत बोलताना सरदेसाईंनी सरकारने खड्डे बुजवण्यासाठी घेतलेल्या जेट पॅचर मशिनचा दाखला दिला. जेट पॅचर मशिनच्या मदतीने राज्यातील 18,899 खड्डे बुजवण्यात आले. यासाठी सरकारने तब्बल 30 कोटी 52 लाख खर्च केल्याची आकडेवारी सरदेसाईंनी दिली.

सरसरी काढली असता एका खड्ड्यासाठी सरकारने सोळा हजार रुपये खर्च केल्याचे दिसते, असे आमदार सरदेसाई सभागृहात म्हणाले.

लाडूंसाठी ४० लाख

प्रोटोकॉल खात्याने व्हिआयपी लोकांच्या वाहतुकीसाठी २०२२ पासून ४.३२ कोटी रुपये खर्च केले. १.३३ कोटी त्यांच्या पाईव्ह स्टार हॉटेल मधील राहण्यावर खर्च केले तर १.७ कोटी केटरिंगवर खर्च करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे लाडूसाठी ४० लाख रुपये खर्च केल्याची माहिती, विजय सरदेसाईंनी सभागृहात दिली.

याशिवाय विजयसरदेसाईंनी सफारी घालून बाऊन्सर म्हणून फिरण्याचा बॉडीबिल्डर्सचा ट्रेंड आल्याचे म्हणत, खाजगी सुरक्षा रक्षक कायद्यांतर्गत खाजगी सुरक्षा सेवांचे ऑडिट व्हायला हवे, अशी मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT