'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

Goa Assembly Monsoon Session 2025: पोगोचा प्रस्ताव मांडण्यास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विरोध केला. विरोध करताच वीरेश बोरकर चांगलेच आक्रमक होत झाले
MLA removed from Goa Assembly
Goa Assembly chaos POGODainik Gomantak
Published on
Updated on

पर्वरी: आरजीच्या वीरेश बोरकर यांच्या पोगो (POGO) या खासगी ठरावावरुन पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी मोठा गोंधळ झाला. पोगो प्रस्तावातील व्याख्या १९९५ सालच्या राजपत्रात पूर्वीच नोंद असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी बोरकार यांना खासगी ठराव मांडण्यास विरोध केला.

यावरुन वीरेश यांच्यासह विरोधी पक्षनेते युरी आलेमाव चांगलेच आक्रमक झाले. किमान चर्चा तरी व्हावी या मागणीसह विरोध सभातीच्या हौदात गेले. युरी आक्रमक होत त्यांना गॅझेटची पाने फाडून हवेत भिरकावली, एवढेच नव्हे तर हौदाजवळील खुर्च्या उचलण्याचा देखील प्रयत्न केला.

रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षाचा महत्वकांक्षी पर्सन ऑफ गोवन ओरिजन (पोगो) खासगी ठराव पुन्हा एकदा आमदार वीरेश बोरकर यांनी विधानसभेत मांडण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी १० फेब्रुवारी १९९५ च्या गॅझेटचा दाखला देत पोगोत समाविष्ट व्याख्याचा त्यात उल्लेख असल्याचे नमूद केले.

पोगोचा प्रस्ताव मांडण्यास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विरोध केला. विरोध करताच विरेश बोरकर चांगलेच आक्रमक होत झाले, याला युरी आलेमाव यांनी देखील बोरकर यांना बोलण्याची संधी द्यावी अशी मागणी केली.

MLA removed from Goa Assembly
Goa News: ऐतिहासिक! 1972 पूर्वी अभयारण्यात आलेली, सर्व्हे आराखड्यावर नोंद असलेली एक लाख घरे कायदेशीर होणार, 1 ऑगस्टपासून प्रक्रिया

मुख्यमंत्री सावंत भूमिकेवर ठाम राहत ठराव मांडण्यास नकार दिल्यानंतर विरोधी पक्षातील आमदारांंनी सभापतींच्या हौदात धाव घेत निदर्शन केले. यावेळी आलेमाव चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले, आलेमाव यांनी हातातील कागद हवेत भिरकावले तर काही कागद फाडून टाकले.

एवढेच नव्हे तर आलेमाव यांनी हौदासमोरील टेबलवरचे पुस्तक आणि कागद ओढून भिरकावण्याचा प्रयत्न केला. आलेमाव यांनी खूर्च्या देखील ओढण्याचा प्रयत्न देखील केला. अखेर सभापतींनी बोलण्यास परवानगी दिल्यानंतर विरोधकांनी माघार घेतली.

वीरेश बोरकरांनी ठरावावर भाषण करुन समिती स्थापन करण्याची मागणी केली. दरम्यान, मुख्यमंत्री यांनी गोवन ओरिजनची व्याख्या स्पष्ट असल्याचे सांगितले तसेच, ठरावात समिती स्थापन करण्याच्या मागणीचा उल्लेख नसल्याचे स्पष्ट केले.

बोरकरांनी ठराव मागे घेण्यास नकार दिल्यानंतर विरोधकांनी डिव्हिजन घेण्याची मागणी केली. याचवेळी मुख्यमंत्री सावंत यांनी ठराव फेटाळला असल्याचे सांगत बाजू लावून धरली. याचवेळी वीरेश बोरकरांनी हौदात जाऊन गोंधळ घातला. सभापतींनी यावेळी बोरकरांना अखेरची वॉर्निंग दिली व त्यानंतर बाहेर काढण्याचे सूचना दिली.

MLA removed from Goa Assembly
Goa Third District: तिसऱ्या जिल्ह्याचा मार्ग मोकळा; गोवा मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

गोव्यात भाजपचे सालाझारचे शासन, हुकूमशाही, हिटलरशाही सुरु

सभापतींच्या सूचनेनुसार आमदार वीरेश बोरकरांना यावेळी सभागृहाच्या बाहेर काढण्यात आले. यावेळी बोरकरांनी गोव्यात भाजपचे सालाझारचे शासन सुरु असल्याच्या घोषणा दिल्या, राज्यात हिटलरशाही, हुकूमशाही सुरु असल्याचा आरोप केला. युरी आलेमाव देखील ही लोकशाहीची हत्या असल्याचे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com