
Joe Root Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना (Fourth Test Match) मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) मैदानावर खेळला जात आहे. या मैदानावर पुन्हा एकदा इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुटने (Joe Root) मोठा पराक्रम केला. या सामन्यात रुटने राहुल द्रविड आणि जॅक कॅलिसच्या विक्रमांनाही मोडीत काढले. ओल्ड ट्रॅफर्डवर रुटच्या शानदार फलंदाजीपुढे भारतीय गोलंदाज (Indian Bowlers) पूर्णपणे हतबल दिसले. कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) तो आता सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज बनला.
जो रुटने (Joe Root) चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशीही (Third Day) आपली शानदार फलंदाजी सुरg ठेवली. इंग्लिश फलंदाजाने ९९ चेंडूत आपले अर्धशतक (Half-Century) पूर्ण केले. रूटला दुसऱ्या टोकाकडून ऑली पोपचीही (Ollie Pope) चांगली साथ मिळाली. आपल्या या खेळीदरम्यान रुटने मँचेस्टरच्या मैदानावर एक मोठी कामगिरी केली आहे.
तो ओल्ड ट्रॅफर्डवर 1000धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज बनला. या मैदानावर रुटपूर्वी कोणत्याही फलंदाजाने अशी कामगिरी केली नव्हती. इतकंच नाही, तर दोन मैदानांवर हजारपेक्षा जास्त धावा करणारा रुट हा इंग्लंडचा (England) दुसरा फलंदाज ठरला. त्याच्याशिवाय एलिस्टर कूक (Alastair Cook) आणि ग्रॅहम गूच (Graham Gooch) यांनीच ही कामगिरी केली.
जो रुटने यासोबतच राहुल द्रविड आणि जॅक कॅलिस यांनाही मागे टाकले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रुट आता तिसऱ्या क्रमांकावर आला. क्रिकेटच्या या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये द्रविडच्या नावावर 13,288 धावा आहेत, तर कॅलिसने 13,289 धावा केल्या आहेत. रुट आता या दोघांच्याही पुढे गेला आहे. इंग्लिश फलंदाजाच्या पुढे आता फक्त रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आहेत. सचिन 15,921 धावांसह या यादीत अव्वल स्थानी विराजमान आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.